Jalgaon News : ‘यावल उपसा सिंचन’मुळे जलपातळी वाढणार : आमदार शिरीष चौधरी

Jalgaon : यावल तालुक्यातील १९ गावांच्या एकूण ९ हजार १२८ हेक्टर लाभक्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून, जलपातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-Proposed Yaval Upsa Irrigation Scheme (Shelgaon Barrage) Yaval project
-Proposed Yaval Upsa Irrigation Scheme (Shelgaon Barrage) Yaval projectesakal
Updated on

Jalgaon News : प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजना (शेळगाव बॅरेज) प्रकल्पास तत्त्वतः मान्यता मिळाल्याने आमदार शिरीष चौधरी यांनी समाधान व्यक्त केले असून, या योजनेद्वारे यावल तालुक्यातील १९ गावांच्या एकूण ९ हजार १२८ हेक्टर लाभक्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून, जलपातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार शिरीष चौधरी म्हणाले, की शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट करून प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यात पाणीसाठा ११६.३६६ दलघमी इतका असून, त्यापैकी प्रकल्पाच्या सिंचनासाठी ८७.५९७ दलघमी पाणी वापर गृहीत धरण्यात आले होते. (Water level will rise due to Yawal Upsa Sinchan )

या उपसा सिंचन योजनेद्वारे यावल तालुक्यातील १९ गावांच्या एकूण ९ हजार १२८ हेक्टर लाभक्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सदर लाभक्षेत्र हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व हतनूर उजव्या कालव्याच्या वरील बाजूस येत असून, उपलब्ध पाण्याचा वापर व जमिनीत मुरणारे पाणी यातील तफावतीमुळे दिवसेंदिवस भूजल पातळी एक मीटर प्रतिवर्षप्रमाणे खालावत असून, आजमितीस सुमारे ३०० फुटाच्या जास्त खोल गेलेली आहे. (latest marathi news)

-Proposed Yaval Upsa Irrigation Scheme (Shelgaon Barrage) Yaval project
Jalgaon News : वीजजोडणी राहिलेल्या पाणीयोजना सुरू करा; मंत्रालयात झालेल्या जलजीवन आढावा बैठकीत मंत्री पाटील यांचे निर्देश

भूजल यंत्रणा या विभागाने २००७ - २००८ च्या भूजल पातळी सर्वेक्षण अहवालामध्ये यावल तालुक्याचा बहुतेक भाग (डार्कझोन) घोषित केलेला आहे. यासाठी उपसा सिंचन योजनेसाठी आमदार शिरीष चौधरी हे २०१० पासून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका लावून शेळगाव बॅरेजच्या १ हजार ६७ कोटी रूपये किमतीच्या सुधारित अहवालात समाविष्ट केले. तेव्हापासून आजपर्यंत आमदार शिरीष चौधरी यांनी प्रयत्नाने हा प्रश्न तडीस नेला.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रागांच्या पायथ्याशी असलेल्या किनगाव, दहिगाव, सौखेडा, कठोरा, सांगवी बुद्रुक आदी डॉर्क झोनमधील भागातील गावांची खालावलेली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना बारमाही बागयती पिके घेण्यास मदत होईल. त्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

-Proposed Yaval Upsa Irrigation Scheme (Shelgaon Barrage) Yaval project
Jalgaon News : शाळेच्या पटांगणात खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.