Jalgaon Crime News : भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपींसह अन्य गुन्हेगारांवर ‘मोक्का’

Jalgaon Crime : राज्याला हादरा देणाऱ्या भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर आता ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
Jalgaon Crime
Jalgaon Crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : राज्याला हादरा देणाऱ्या भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर आता ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासोबत गुन्हेगारी श्रेत्रातील इतरही गुन्हेगारांवर अशीच कारवाई केली जाणार असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बारसे व राखुंडे यांचा शहरातील मरिमाता मंदिर परिसरात निर्घृण खून झाला होता. (Moka on accused and other criminals in double murder)

याप्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी, बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पथरोड, नितीन पथरोड व अन्य तीन अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल आहे. या खुनानंतर शहरातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने तयार केला. तो प्रस्ताव नाशिक येथील पोलिस महानिरिक्षकांच्या कार्यालयाकडे पाठविला आहे. गुन्हेगारीवर वचक रहावा, सोबतच गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही अन्य गुन्हेगारांवरही याच प्रकारची कारवाईच्या हालचाली पोलिस प्रशासनाने सुरू केल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली.

Jalgaon Crime
Jalgaon Crime News : अपमान जिव्हारी लागला, झोपेतच गळा चिरला; जळगाव जिल्हा कारागृहात बंदिवानाकडून एकाची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.