Jalgaon Rain Update: जिल्ह्यातील ‘मान्सून’ला सोमवारपासून लागणार ब्रेक! अतिपावसापासून दिलासा; एक आक्टोबरपासून तापमानात होणार वाढ

Latest Jalgaon News : या दिवसापासून मॉन्सून पूर्णता थांबेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केला. परतीच्या पावसाने सुमारे आठशे एकरवरील केळी, कापूस इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
rain
rainesakal
Updated on

Jalgaon Rain Update : शहरासह जिल्ह्यात गेल्या मंगळवारपासून धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसापासून नागरिकांना येत्या ३० सप्टेंबरपासून दिलासा मिळणार आहे. या दिवसापासून मॉन्सून पूर्णता थांबेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केला. परतीच्या पावसाने सुमारे आठशे एकरवरील केळी, कापूस इतर पिकांचे नुकसान झाले आहे. (Monsoon in district will have break from Monday)

गेल्या आठवड्यात दररोज किमान अर्धा ते एक तास विजांचा गडगडाटासह तुफान पाऊस होत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. असा पाऊस जूनच्या सुरवातीस अपेक्षित हेाता. मात्र, तो माॅन्सूनच्या शेवटी पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जुनच्या सुरवातीस असा पाऊस झाला असता, तर शेतीचे उत्पन्न अधिक आले असते. आता परतीचा धुवाधार पाऊस कापूस, केळी पिकांचे नुकसान करून गेल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.

‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा

जळगाव शहरात एक ते १२ ऑक्टोबरदरम्यान उन्हाळासदृश्य उष्ण वातावरण असेल. थोडक्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा जळगावकरांना सहन करावा लागणार आहे. एक ऑक्टोबरपासूनच तापमानात वाढ व्हायला सुरवात होईल. कमाल तापमान ३८ ते ४० अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाहकता जास्त असेल मात्र, दुसऱ्या आठवड्यात ती कमी कमी होत जाईल.

ही आहेत कारणे!

ऑक्टोबर महिन्यातील ‘हिट वेव्ह’ किंवा वाढीव तापमानामागील प्रमुख कारण असे आहे की, दक्षिण-पश्चिम मॉन्सूनचे वारे कमकुवत होतात. हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो, अशावेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करतात.

या अतिनील किरणांमुळे उष्णता वाढते. ऑक्टोबरदरम्यान सूर्याच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या हालचालींसह उत्तरेकडील मैदानांवर मॉन्सूनचा कुंड किंवा कमी दाबाचा कुंड कमकुवत होतो. हे हळूहळू उच्चदाब प्रणालीद्वारे बदलले जात असते. यावेळी जमिनीत मुरलेले पाणी वाफ होऊन वर उडत असते. (latest marathi news)

rain
नवीन योजनांमुळे महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात, वित्त विभागाच्या विरोधानंतरही योजनांना मंजुरी!

वरून सूर्याची उष्णता व जमीन तापून ओल्या जमिनीतील गरम वाफ होऊन वर उडणारे पाणी (वाफ) यामुळे दुहेरी उष्णतेचा अनुभव ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो. दक्षिण-पश्चिम मॉन्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागते.

या कालावधीत सूर्य हा विषुववृत्तावर असतो. त्यामुळे सूर्याचे किरण अत्यंत सरळ व मुबलक प्रमाणात जमिनीवर पोहोचतात. त्यामुळेदेखील तापमान वाढते. दरम्यानच्या कालावधीत जळगावकरांना कधी कधी पहाटे व रात्रीही थंडगार वाटते, तर ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे दिवस बऱ्यापैकी उष्ण जाणवतील.

आरोग्याच्या तक्रारी वाढणार!

पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे जाताना अशी बदललेली हवा म्हणजे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याचीच शक्यता जास्त. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही ऑक्टोबर हिट बाधत नाही आणि तब्ब्येत चांगली राहण्यास मदत होते. डेंगी, सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स अशा विविध समस्या या काळात डोके वर काढतात.

अशी घ्यावी लागणार काळजी!

-आजारी असताना घराबाहेर पडणे टाळा

-डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या

-आहाराकडे लक्ष द्यायला हवे

-उपचारांना टाळाटाळ नको

rain
Jalgaon News : ‘रफूचक्कर’ झालेल्यांना मिळाले ‘मोबाईल’चे बळ! घरातून पळून गेलेल्या युवक-युवतींच्या जबाबातून मिळाली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.