Jalgaon Monsoon Delay : जिल्ह्यात जूनचा पंधरवडा उलटला, तरी पेरण्यायोग्य पावसाने हजेरी लावलेली नाही. जामनेर, पाचोरा, भडगाव तालुका वगळता इतरत्र अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाअभावी कोरडवाहू खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. चांगला मान्सून २४ जूनपासून सक्रिय हेाईल, तो २ जुलैपर्यंत राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तविला आहे. ( Monsoon Rain is delaying in district )
जळगाव शहरात पाऊस झाला. मात्र, इतर तालुक्यांत पाऊस झाला नाही. यामुळे जूनमध्येही तापमानाचा पारा चढलाच आहे. शासनाच्या हवामान विभागाने यंदा जूनपासूनच पाऊस सुरू होईल. सरासरीपेक्षा अधिक १०८ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत केले होते. ते फोल ठरतेय? याबाबत शेतकऱ्यांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दरवर्षी ७ जूनला मान्सून दाखल होतो. यंदा तो १९ जूनला जळगाव जिल्ह्यात आला. मात्र, त्याला पोषक वातावरण नसल्याने पावसाने १३ जूनपासून ब्रेक घेतला आहे. एव्हाना तो जिल्ह्यात सर्वत्र सक्रियच झाला नाही. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य शेत तयार करून ठेवले आहे. बियाणे व खतांची खरेदी झाली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
उडीद, मुगात घट येणार
पाऊस लांबल्याने उडीद, मुगाची उशिरा पेरण्या होतील. परिणामी, त्या पिकांच्या उत्पादनात घटीची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात येतो. यामुळे उडीद, मुगाच्या उत्पादनात घट येत आहे. (latest marathi news)
१९-२० ला पावसाचा शक्यता
येत्या १९ किंवा २० जूनला जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुन्हा पावसाचा खंड पडेल. नंतर २४ जूनपासून सर्वत्र जोरदार पाउस सुरू होईल. तो २ जुलैपर्यंत सक्रीय राहील. त्यानंतर पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.
''गेल्या १३ जूनपासून पावसाचा खंड आहे. तो १९ जूनपर्यंत राहील. १९ किंवा २० जूनला काही ठिकाणी पाऊस होईल. २४ जूनपासून सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.''-नीलेश गोरे, हवामान अभ्यासक
''जिल्ह्यात तीन-चार तालुका वगळता इतरत्र अत्यल्प पाऊस झाला आहे. २१ जूननंतर मान्सून जोरदार सक्रिय होईल. उडीद, मुगाचे उत्पादन उशिराच्या पावसाने कमी येईल. मात्र, १५ जुलैपर्यंत सर्व पेरण्या पूर्ण होतील. शेतकऱ्यांनी पेरण्यायोग्य पाउस होईपर्यंत पेरण्या करू नयेत.''-कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेला पाऊस
तालुका--१५ जूनचा पाऊस--आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
जळगाव--७.७--१०१.१
भुसावळ--०१.--७५.६
यावल--०.९--६४.४
रावेर--०.९--६१.४
मुक्ताईनगर--०.०--८२.८
अमळनेर--१५.३--६६.९
चोपडा--०.३--३१.५
एरंडोल--०.३--६९.३
पारोळा--०.३--२७.३
चाळीसगाव--१५.१--९५.९
जामनेर--०.३--१३०.३
पाचोरा--१.७--११५.८
भडगाव--३.०--१०५.३
धरणगाव--५.४--२७.१
बोदवड--०.०--५६.१
सरासरी--४.१--७६.३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.