Jalgaon Monsoon Update : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला! 2 दिवसांपासून रिपरिपने जनजीवन विस्कळित

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जोर वाढविला आहे. कधी जोरात, तर कधी पावसाची रिपरिपीने जनजीवन विस्कळित झाले आहे.
Motorists heading home through the rain.
Motorists heading home through the rain.esakal
Updated on

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जोर वाढविला आहे. कधी जोरात, तर कधी पावसाची रिपरिपीने जनजीवन विस्कळित झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी सांगतात. सोबतच धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे. मंगळवार (ता. २३)पासून पावसाची अंतराअंतराने रिपरिप सुरू आहे. (rain has increased in district)

बुधवारी (ता. २४) सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसाने अनेक खोलगट भागात पाणी साचल्याने वाहनधारकांसह नागरिकांचे हाल होत आहेत.

रस्त्यांची लागली वाट

दोन दिवसांपासून रिपरिपने शहरासह महामार्गावरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनधारकांची वाहने खड्ड्यात अडकून पडल्याच्या घटना घडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Motorists heading home through the rain.
Jalgaon News : अमळनेर शहरात बेशिस्त पार्किंग करणाऱ्या 54 वाहनांवर कारवाई!

बाजारात गर्दी कमी

पावसाच्या रिपरिपने बाजारपेठांमध्ये काहीअंशी शुकशुकाट दिसून येत आहे. आवश्‍यक असेल, तरच नागरिक रेनकोट, छत्र्या घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. पावसामुळे बाजारात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Motorists heading home through the rain.
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा गाजर दाखवून निषेध!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()