Jalgaon News : पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून; 5 दिवसांनी लागला छड

Jalgaon : वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून झाल्याची घटना घडली होती.
crime
crime esakal
Updated on

Jalgaon News : वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून झाल्याची घटना घडली होती. ही घटना अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी झाली असावी, असे चित्र दिसून येत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा अखेर पाच दिवसानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले असून, ९० वर्षीय आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला बेदम मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Mother killed by son for pension amount )

मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. राधाबाई भालचंद्र परदेशी (वय ९०) या वाकडी गावात एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांच्या मुलगा सुभाष परदेशी (वय ६५) हा कुटुंबासह राहतो. दरम्यान, शनिवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान मुलगा सुभाष याच्या घरून राधाबाई निघाल्या व त्या राहत असलेल्या घरी आल्या होत्या.

त्यानंतर दुपारी बारा ते एकच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला होता. मृत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. या घटने प्रकरणी रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला. या गुन्ह्यात फत्तेपूर पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी कामाला लागले होते. त्यांनी घटनेप्रकरणी एकेक धागा जोडून तपास केला.

crime
Jalgaon News : खासगी मराठी शाळांची विद्यार्थी शोधमोहीम! शिक्षकांची घरोघरी भटकंती

मात्र तपास लागत नव्हता. अखेर पाच दिवसांनंतर ‘एलसीबी’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाला यश आले आहे. त्यांनी मृत राधाबाई यांचा मुलगा सुभाष परदेशी यास अटक केली. त्याने तपासात पोलिसांपुढे गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सुभाष याचे वडील अर्थात राधाबाई यांचे पती शिक्षक होते. निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन सुरू होती. दरवेळी तीन महिन्यांचा पगार घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा.

पेन्शनच्या रकमेतून चार ते पाच हजार रुपये आई राधाबाई यांना देत असे बाकीचे सर्व पैसे तो त्याच्याकडे ठेवत होता. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला व सुभाष साय सोबत येण्यास नकार दिला होता. यामुळे सुभाषला राग आला होता. शनिवारी त्याने आईसोबत वाद घातला आणि आईला जबर मारहाण केली. मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला.

पाच दिवसांत पोलिसांनी तपास लावून संशयितास ताब्यात घेतले. तपास कामी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील सहाय्यक निरीक्षक गणेश फड, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, अकरम शेख, किशोर राठोड, विजय पाटील, रणजित जाधव, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी प्रमोद ठाकूर, अभिलाषा मनोरे, मंगला तायडे आदींनी कारवाई केली.

crime
Jalgaon News : मद्यपी मुलाकडून पित्याचा खून; पळसखेड्यातील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.