Jalgaon News : शहराचे सौंदर्य व वैभव मानल्या जाणाऱ्या भडगाव रोडवर पडलेले खड्डे दिवसागणिक मोठे होऊन जीवघेणे ठरत आहे. यामुळे पादचारी व वाहनचालक त्रस्त झाले असून पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. भडगाव रोड भाग अत्यंत देखणा करण्याचे काम पालिकेने केले आहे. रस्ता दुभाजक त्यात रंगीबेरंगी फुलझाडे व दिवे लावून या भागाला हरितपथ असे नाव देण्यात आले आहे. परंतु या हरित पथाचे वैभव व सौंदर्य विविध समस्यांमुळे डागाळले जात असल्याचे चित्र आहे. ()
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढते अतिक्रमण, रस्त्यांच्या मध्यभागी रस्ता दुभाजक व त्यात पुन्हा रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे अशा चक्रव्युहात नागरिकांना वापरावे लागत आहे. सुशील डेअरी समोर पडलेल्या खड्डयाची लांबी, रुंदी व खोली दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारा समोरील खड्डेही मोठे होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पालिकेने या खड्ड्यांची डागडूजी केली होती. परंतु हे खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत.
नगरपालिकेचे दुर्लक्ष
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक घसरून पडण्याचे व जखमी होण्याचे प्रकार व प्रमाण वाढत आहे. पालिकेकडे या संदर्भात बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या. मात्र, पालिका प्रशासन सुस्त आहे. या खड्ड्यांमुळे किती नागरिकांचे जीव घेण्याची प्रतीक्षा पालिकेला आहे हे पालिकेलाच ठाऊक. परंतु यामुळे समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. (latest marathi news)
पालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, प्रशासक, कर्मचारी याच रस्त्याने वापरतात. परंतु त्यांना हे जीवघेणे खड्डे दिसत नाहीत का? असा प्रश्न नागरिकांकडून संतप्त भावनेने उपस्थित केला जात आहे. पालिकेने निदान एखादा रस्ता तरी सुयोग्य स्थितीत ठेवावा. ज्या रस्त्याला पालिकेनेच हरितपथ नाव दिले आहे त्या रस्त्याच्या दैन्यावस्थेकडे तरी पालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे. अर्ध्या रस्त्यापर्यंत दुकानदारांच्या होत असलेल्या अतिक्रमणाचा विषय देखील पालिकेने गांभीर्याने घ्यावा.
भडगाव रोड भागात राहणारे बहुतांश रहिवासी हे पालिकेचा नियमित कर भरणारे आहेत. तसेच शहरातील प्रत्येक व्यक्ती दिवसातून एकदा तरी या भागात आल्याशिवाय राहत नाही. सायंकाळी तर या रस्त्याची चौपाटी सदृश्य स्थिती होते. असे असताना मोठमोठ्या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करावे हे अत्यंत गंभीर व क्लेशदायक असून या खड्ड्यांमुळे जीवित हानी होण्याअगोदर पालिकेने या रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करावी व नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.