वावडे (ता. अमळनेर) : थकित वीजविलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ने जोरदार तयारी केली असून, मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या कॉल सेंटरमधून येणार आहेत. कारण यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागात स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करणार आहे. त्यासाठी ३०० कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. राज्यात महावितरणचे जवळपास पावणे तीन कोटी वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे ७० हजार कोटीहून अधिक वीजबिलाची रक्कम थकित आहे. ()