MSEB Jalgaon : वीज खंडित थकबाकीदारांना महावितरणचा दिलासा

MSEB Jalgaon
MSEB Jalgaon esakal
Updated on

जळगाव : वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी विलासराव देशमुख अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळाली आहे.

विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल.

हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक ग्राहकांना पहिला हप्ता मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या सात दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.(Jalgaon MSEB Relief to power cut arrears Jalgaon news)

MSEB Jalgaon
Town Planning Department: अधिकाऱ्यांकडे येणाऱ्यांवर नजर? फायली मंजुरीसाठी नंतर संपर्क

डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगरकृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी अर्थात १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत होता. मात्र, अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

...तर तो ग्राहक योजनेतून अपात्र

ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ ला किंवा त्यापूर्वी मंजूर केले आहेत त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.

MSEB Jalgaon
Jalgaon Road Accident : जळगावातून जातात मृत्यूचे महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.