Jalgaon MSRTC Depot : बसपोर्टची प्रतीक्षाच; ‘पे ॲंड पार्क’ही बंद! जळगाव बसस्थानक अडकले असुविधांच्या गर्तेत

Latest Jalgaon News : बसस्थानकात असलेल्या ‘पे अँड पार्क’ ही सुविधादेखील बंद केल्याने वाहन लावण्यासाठी जागाच नाही. परिणामी, बसस्थानक आवारात पार्किंग होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहण्यास मिळते.
Potholes in bus stand area & dilapidated cement benches for passengers
Potholes in bus stand area & dilapidated cement benches for passengersesakal
Updated on

Jalgaon MSRTC Depot : येथील बसस्थानकाचे हे बसपोर्ट बनविण्याची संकल्पना कधीच हवेत विरली. यामुळे बसस्थानकात पुरेशा सुविधा मिळणे, हे दुरापास्तच म्हणावे लागेल. प्रवाशांची कायम वर्दळ असल्याने येथे कचरा हा पसरणारच. परंतु त्याची नियमित सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरलेले. याशिवाय बसस्थानकात असलेल्या ‘पे अँड पार्क’ ही सुविधादेखील बंद केल्याने वाहन लावण्यासाठी जागाच नाही. परिणामी, बसस्थानक आवारात पार्किंग होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहण्यास मिळते. (jalgaon MSRTC Depot stuck in pit of inconvenience)

राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागीय कार्यालय असलेले जळगाव आगाराचेच बसस्थानक हे समस्यांचे आगार बनले आहे. साधारण सहा- सात वर्षांपूर्वी जळगाव बसस्थानकाला बसपोर्ट करण्याचा प्रस्ताव होता. बसपोर्ट होणार म्हणून कोणत्याच दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले गेले नाही.

बसस्थानकांच्या आवारात झालेले डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने बसस्थानक परिसराला खड्डयांचा विळखा पडला आहे. यामुळे बसमधील प्रवासी आणि आवारात बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. जलमंदिराजवळील पार्किंगची जागा मोकळी केल्यानंतर तेथे पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहे. ही एक सुधारणा सोडली, तर बसस्थानकाची दैना कायम आहे.

पे अँड पार्कही बंद

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांना नवा लूक देऊन बसस्थानकाच्या जागी सर्व सुविधांनीयुक्त असे बसपोर्ट साकारण्याची संकल्पना आणली होती. मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात न उतरता कागदावरच राहिली. बसपोर्टच्या माध्यमातून सुधारणेच्या प्रतीक्षेत राहून प्रवाशांना मात्र समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शिवाय, बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेली पे अँड पार्कची सुविधादेखील मोडीत काढली आहे. अर्थात बसस्थानक सुशोभीकरणाच्या नावाने पार्किंग काढली. परंतु, हे करताना पर्यायी व्यवस्था केली गेली नाही. यामुळे आता ही पार्किंगची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. परिणामी, बसस्थानकाच्या आवारातच पार्किंग केली जात आहे.

बस लावण्यातही शिस्त नाही

बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. अर्थात येथे येणारा प्रत्येक प्रवासी प्रथम चौकशी कक्षात विचारणा करतो. यानंतर बस कोणत्या ठिकाणी लागेल यासाठी लिहिलेल्या फलकांवरील गावांची नावे वाचून त्यानुसार बसच्या प्रतीक्षेत थांबत असतो. मात्र याठिकाणी बस लावताना देखील व्यवस्थित लावल्या जात नाहीत. ज्या ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी बस उभी करण्याचे काम चालक करत असतो. यामुळे प्रवाशांची देखील धावपळ होत असते. (latest marathi news)

Potholes in bus stand area & dilapidated cement benches for passengers
Malegaon MSRTC Depot : उत्पन्नावर आघाडीवर असूनही मालेगाव आगाराला समस्यांचा विळखा!

...या आहेत समस्या

- बसस्थानकातच खड्डे

- आवारातील डांबरीकरण उखडले

- नियमित साफसफाईचा अभाव

- बसस्थानक आवारातच पार्किंग

- अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर

- आवारातून खासगी वाहनांचा वावर

- बहुतांश गाड्याच्या स्थिती वाइट

- बसमधून प्रथमोपचार पेट्या गायब

- अग्निरोधक यंत्रणा नावालाच

- तांत्रिक वैधता तपासण्याची गरज

प्रवासी म्हणतात...

"जळगाव बसस्थानक आवारात नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे थांबणे देखील कठीण बसले आहे. एसटी महामंडळाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे."- पंकज नाले, प्रवासी, जळगाव

"आगारातील बहुतांश जुन्या आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसची स्थिती बरी असली तरी ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची अत्यंत दुरवस्था आहे. त्यात ग्रामीण भागात रस्ते खराब असल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना शारीरिक त्रास उद्भवतात. आगारात नवीन बस आणाव्यात."- गणेश चौधरी, प्रवासी, जळगाव

"बसस्थानक आवारात पार्किंगचा प्रश्‍न गंभीर आहे. पार्किंग बंद असल्याने वाहने लावायची कुठे, असा प्रश्‍न निर्माण होते. चोरीच्या भीतीने वाहनधारक थेट आगारातच वाहने नेतात. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यावर त्वरित मार्ग काढावा."

- सिद्धार्थ वारडे, प्रवासी, जळगाव

"बसस्थानकात सुधारणा करण्यासाठी बीओटी तत्त्वावर काम देण्याचे नियोजन आहे. तसेच दुचाकी पार्किंगसाठी ‘पे अँड पार्क’साठी टेंडर काढण्यात आले असून, त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही."- संदीप पाटील, आगारप्रमुख, जळगाव आगार.

Potholes in bus stand area & dilapidated cement benches for passengers
Pimplegaon Baswant MSRTC Depot : श्रीमंत आगार, समस्यांनी बेजार! पिंपळगाव बसवंत आगार समस्यांच्या फेऱ्यात; बसेस बनल्या खिळखिळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.