मतदारसंघ माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून हिसकावून घेत गतवेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मारली बाजी. त्यांच्यासमोर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांचे आव्हान शक्य. मतदारसंघात वंचित आघाडीसह मनसेची उमेदवार देण्याची तयारी.
सरळ लढत बहुरंगी होण्याची शक्यता. पाटील आणि खडसे लढतीत आता मराठा समाजातील उद्योजक, कंत्राटदार विनोद सोनवणेंचे नाव आघाडीवर. भाजपने मतदार संघावर दावा केल्याने अशोक कांडेलकरांना उमेदवारी मिळाल्यास चौरंगी लढत. (Muktainagar Assembly Closely contested in individual contests)