Muktainagar MSRTC Depot : मुक्ताईनगर बसस्थानक समस्यांचा विळख्यात; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

MSRTC Depot : सतत गजबजलेल्या येथील बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
Muktainagar bus stand problem, lack of drinking water, plight of toilets, women's squalor, health issues due to garbage
Muktainagar bus stand problem, lack of drinking water, plight of toilets, women's squalor, health issues due to garbageesakal
Updated on

मुक्ताईनगर : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयाची दुर्दशा, धुळीने माखलेले अंतर्गत रस्ते, पडून असलेला कचरा, बसवाहतुकीमुळे उडणारी धूळ, उन्हात थांबलेले प्रवासी, परिसरात आलेली झाडेझुडपे, चांगले सुसज्ज जाणूनबुजून कालबाह्य केलेले जलकुंभ, हे चित्र आहे. सतत गजबजलेल्या येथील बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय अनेक समस्यांच्या गर्तेत मुक्ताईनगरचे बसस्थानक अडकल्याचे दिसून येत आहे. (Muktainagar bus stand is in bad condition)

तालुक्याचे शहर असलेले मुक्ताईनगर वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मुक्ताईची पावन भूमी आहे. येथील मुक्ताई पर्यटनस्थळामुळे प्रवाशांची संख्यादेखील मोठी असते. मात्र, बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलकुंभ पाण्याअभावी आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने तहान भागविण्यासाठी फिरावे लागत आहे.

सार्वजनिक नळ व इतर कोणतीही पाण्याची व्यवस्था नसल्याने अबालवृद्धांसह सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकात आसनव्यवस्था आहे मात्र, पंख्यांची स्थिती नाजून असून, नसल्यासारखीच आहे. पथदिवे असूनही नसल्यासारखेच आहेत. शौचालयाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची कुचंबना होताना दिसत आहे. प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात कचऱ्याचा ढिगारा आहे. प्रवासी त्यावरच लघुशंका करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (latest marathi news)

Muktainagar bus stand problem, lack of drinking water, plight of toilets, women's squalor, health issues due to garbage
Satana MSRTC Depot : जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास! नव्या गाड्यांची प्रतिक्षा; परिसरात खड्डे अन्‌ घाणीचे साम्राज्य

पोलिस चौकी नाही, हिरकणी कक्ष बंदच

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी नाही. त्यामुळे बसस्थानकात जीवघेणे हल्ले, चोऱ्या, महिलांचे मंगळसूत्र हिसकावणे अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडतात. नवजात बालक व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू केला होता. मात्र, या हिरकणी कक्षाला सध्या कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. वाचमन व पोलिस नसल्याने बसस्थानक टवळखोरांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची छेळखानीच्या घटनांत वाढ झाली आहे. म्हणून विद्यर्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍न निर्माण झाल्याने पालक चिंताग्रस्त आहेत.

''मुक्ताईनगर बसस्थानक सर्वांना सोयीचे आहे. मात्र, सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी, महिलांना चांगली शौचालयाची व्यवस्था अपेक्षित आहे. बसस्थानकात दररोज साफसफाई करणे गरजेचे आहे.''- दिलीप चौधरी, प्रवासी.

''बसस्थानकात येताच सुरवातीला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पाण्याचा टाक्या आहेत परंतु, पिण्यासाठी व स्वच्छतागृहआत पाणी नाही. त्यातच सफाई कामगार नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.''- सविता पाटील, प्रवासी.

''हिरकणी कक्ष सुरू आहे. मातांनी चाबी मागितली की, हिरकणी कक्षाचे कुलूप उघडून दिले जाते. याशिवाय स्वच्छतागृहासाठी सफाई कामगार आहे. स्वच्छतागृहात घाण असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.''- नीलेश कलाल, आगार व्यवस्थापक, मुक्ताईनगर.

Muktainagar bus stand problem, lack of drinking water, plight of toilets, women's squalor, health issues due to garbage
Amalner MSRTC Depot: अमळनेर येथील बसस्थानक असुविधांचे आगार! प्रवाशांचे हाल; परिसरात पायाभूत सुविधांची वाणवा, कर्मचाऱ्यांचीही गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.