Jalgaon News : मुक्ताईनगर पंचायत समितीला ठोकले कुलूप; ‘बीडीओं’ना निलंबित करा

Jalgaon News : उद्धटपणे उत्तर मिळाल्याचे पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी थेट पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले.
Employees and citizens gathered outside the Panchayat Samiti office.
Employees and citizens gathered outside the Panchayat Samiti office.esakal
Updated on

मुक्ताईनगर : येथील पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि अधिकारी यांचा मनमानी कारभार आणि उद्धटपणे उत्तर मिळाल्याचे पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवारी (ता.२४) थेट पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले. दरम्यान, मुक्ताईनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा किंवा जिल्हा परिषदेत जमा केल्याशिवाय कुलूप उघडले जाणार नाही, अशी माहितीही मंत्री खडसे यांनी दिली. (Muktainagar Panchayat Samiti locked by Union Minister Raksha Khadse )

दरम्यान, ‘डीआरडीओ’चे मुख्य अधिकारी लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री खडसे यांची तातडीने भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, रक्षा खडसे आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. मुक्ताईनगर येथील पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता. २४) घरकुल व वैयक्तिक लाभाच्या योजनांसंदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. आढावा बैठकीत तेथील परिस्थिती जाणून घेतली असता बीडिओ व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. (latest marathi news)

Employees and citizens gathered outside the Panchayat Samiti office.
Jalgaon News : भवरखेडेतील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; 6 तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

योजनेचा लाभ मिळत नाही, पैसे घेऊन कामे करतात. ग्रामपंचायतीकडून आलेले ठराव मंजूर न होता दुसऱ्या व्यक्तींकडून आलेले ठराव मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाल्याचे निदर्शनास आल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्व कारभार गेल्या सहा, सात महिन्यापासून सुरू असून, कामे प्रलंबित आहेत. पंचायत समितीच्या बीडीओंच्या कारभाराला सर्वसामान्य वैतागल्या नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पंचायत समितीला कुलूप लावण्याचे पाऊल उचलले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, एकनाथ डवले यांनाही पत्र देण्यात आले असून, बीडीओ निशा जाधव यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्त करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री खडसे यांनी केली आहे. याबाबत, बीडीओ निशा जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या मुक्ताईनगर येथील रुग्णालयात भरती झाल्याचे सांगण्यात आले.

Employees and citizens gathered outside the Panchayat Samiti office.
Jalgaon News : राज्यात 40 हजार कोटींची विकासकामे देयके प्रलंबित; ‘फुकट’ योजनांचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.