Jalgaon News : मुंबई-हावडा मेल (क्रमांक १२८०९)मध्ये टायमर बॉम्ब असून, नाशिक रोड स्थानकापूर्वीच ट्रेन उडविण्याची धमकी ट्विटरवरून दिली होती. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच जळगाव स्थानकावर पहाटे सव्वाचारला पोलिसांसह व बॉम्बशोध पथकाने दोन तास रेल्वेची प्रत्येक बोगीची कसून तपासणी केली. तपासणी कोणतीही संशयित वस्तू न आढळल्याने गाडी पुढे रवाना करण्यात आली. (Mumbai Howrah mail bomb threat)
सोमवारी (ता. १४) मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटाला रेल्वे पोलिसांना ट्विटरद्वारे मुंबई- हावडा मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश मिळाला. त्याची दखल घेत तत्काळ भुसावळ रेल्वे पोलिसांनी जिल्हा पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जळगाव रेल्वे पोलिस, स्टेशन प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांनी यंत्रणांना सतर्क केले.
जळगाव पोलिसांचे बॉम्बशोध पथकासह फौजफाटा रेल्वेस्थानकावर दाखल झाला. सव्वाचारला हावडा-मुंबई मेल फलाट क्रमांक चारवर थांबताच पोलिसांचा फौजफाटा गाडीत शिरला. भुसावळ रेल्वे पोलिस दलाचे अशोक कुमार, बॉम्बशोधक पथकाचे पोलिस निरीक्षक अमोल कवाडे यांच्यासह पथक आरपीएफ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जीआरपी जळगावचे कर्मचारी, ट्रेनचे ट्रेन एस्कॉर्टिंग कर्मचारी, कमर्शियल ट्रेन चेकिंग कर्मचारी आदींनी तब्बल दोन तास ११ मिनिटे संपूर्ण गाडी तपासली.
प्रवाशांची झोप मोड
पोलिस प्रत्येक बोगीतील प्रत्येक प्रवाशांची तपासणी करत संशयित वस्तुचा शोध घेत होते. पहाटे चारची वेळ आणि शांत झोपेत असलेल्या प्रवाशांना गोंधळाने जाग आली. प्रवाशांची झोपमोड झाली. मात्र, अचानक तपासणी कशासाठी, म्हणून काही प्रवाशांनी विचारणाही केली. मात्र, पोलिसांनी त्यांना सुरक्षा तपासणी सांगून वेळ मारून नेली. (latest marathi news)
अधिकृत नोंदीनंतर गाडी रवाना
गाडीचे सर्व डबे तपासल्यानंतर त्याची नोंद जळगावच्या स्टेशन डायरीत करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकासोबत (स्नायफर डॉग) श्वान नसल्यामुळे प्रमाणपत्र दिले नाही. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर मुंबई हावडा मेल जळगाव स्थानकावरून सकाळी ६ वाजून २८ मिनिटाला मुंबईकडे रवाना झाली. यामुळे इतर रेल्वे गाड्यांचाही खोळंबा झाला.
"रेल्वे पोलिसांकडून नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्र-सामुग्रीसह बॉम्बशोधक पथक रेल्वेस्थानकावर दाखल झाले. दोन तास कसून तपासणी केल्यानंतर मुंबई हावडा मेलमध्ये संशयित वस्तू आढळून आली नाही."-डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.