Jalgaon News: महापालिका आयुक्त गेल्या, सोबत कारवाईही गेली! पार्किंग नसलेल्या दुकानांच्या तळमजल्यावरील कारवाई थंड बस्त्यात

Jalgaon News : ‘आयुक्त गेल्या अन्‌ कारवाईही गेली’, असे आता वाटू लागले आहे. प्रभारी आयुक्त याबाबत कारवाईचा निर्णय घेणार काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील व्यापारी संकुलातील तळमजल्यावर पार्किंग दाखवून दुकाने काढणाऱ्या दुकानदारांवर तत्कालीन महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी कारवाईचा धडका लावला होता. मात्र, त्यांची बदली होताच ही कारवाईही थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे ‘आयुक्त गेल्या अन्‌ कारवाईही गेली’, असे आता वाटू लागले आहे. प्रभारी आयुक्त याबाबत कारवाईचा निर्णय घेणार काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. (Jalgaon Municipality Action on ground floor of shops without parking)

शहरातील रस्त्यावर होत असलेल्या बेकायदा पार्किंगबाबत तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी धडक पाऊल उचलले होते. त्यांनी शहरातील व्यापारी संकुलाचे नगरचना विभागामार्फत सर्वेक्षण केले. ज्या संकुलातील दुकानदारांनी तळघरात पार्किंग दाखविले आहे, परंतु त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा न करता दुकाने काढली आहेत. त्यांना नोटिसा बजावल्या.

रस्त्याच्या कडेला पार्किंग सुविधा

नोटिसा बजावण्याचे काम सुरू असतानाच, त्यांनी रस्त्यावर पार्किंगची सुविधा केली. त्यांनी रस्ता दुभाजकापासून आठ मीटरचे अंतर मोजून पांढऱ्यापट्ट्या आखल्या नव्हे, तर खड्डा खोदून पांढऱ्या विटा लावून कायमस्वरूपी आखणी केली. या पट्ट्याच्या आतच दुचाकी व चारचाकी वाहने लावण्याचे आदेश दिले.

जी वाहने पट्ट्याबाहेर लावली होती. ती वाहने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त करून शहर वाहतूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत होत्या. वाहतूक पोलिस त्यांना नियमानुसार दंड आकारणी करीत होते. त्यामुळे दुकानसमोर वाहने लावताना नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने पट्ट्याच्या आत वाहने लावत होते. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Nashik News : सरकारी जागांवरील होर्डिंग्ज धोकादायक! घाटकोपर दुर्घटनेनंतर शहरात तपासणी

दुकानदारांवर कारवाई

एकीकडे रस्त्यावर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असतानाच, व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंग नसलेल्या दुकानदारांनी नोटीसवर समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याच्यावर थेट कारवाई केली. यात महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने जेसीबी लावून तळमजल्यावर थेट तोडफोड करून त्या ठिकाणी वाहन पार्किंगची सुविधा केली.

नेहरू चौक ते टॉवर रस्त्यावरील पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे तळमजल्यावर पार्किंग नसलेल्या दुकानदारांमध्ये भिती निर्माण झाली होती. त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पार्किंगला शिस्त लागण्याची चिन्हे दिसत होते.

बदलीमुळे कारवाई थंडबस्त्यात

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली झाली अन्‌ महापालिकेतर्फे करण्यात येणारी कारवाई थंड बस्त्यात ठेवली आहे. महापालिकेच्या नगरचना विभागाने शहरातील काही भागातील पार्किंग नसलेल्या संकुलाचे सर्वे करून त्याचा अहवाल दिला आहे. मात्र, आता ही कारवाई बंद झाली आहे.

प्रभारी आयुक्तांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्या पुढील कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेने ही कारवाई पुन्हा सुरू केली, तरच रस्त्यावरच्या पार्किंगला शिस्त लागणार आहे. आता पुन्हा रस्त्यावर बेशिस्त पार्किंग सुरू झाली आहे. त्याकडे प्रभारी आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Jalgaon Municipal Corporation
Ramdev Wadi Accident Case : पुण्याचे ‘हिट’ जळगावचे ‘रन’! 15 दिवसांनंतर मुंबईतून दोघे संशयित ताब्यात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.