जळगाव मनपाचे ११० बेडचे सीसीसी पुन्हा सज्ज

गरज पडल्यास आणखी वाढविण्याची माहिती
जळगाव मनपाचे ११० बेडचे सीसीसी पुन्हा सज्ज
जळगाव मनपाचे ११० बेडचे सीसीसी पुन्हा सज्जsakal
Updated on

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरल्यानंतर बंद पडलेले महापालिकेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर (Covid Care Center) पुन्हा सुरू होण्याच्या बेतात आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून रुग्ण वाढू लागल्यानंतर ११० बेडचे कोविड (Covid bed) सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलैनंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली होती व नोव्हेंबर, डिसेंबर २०२१पर्यंत ती पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र, कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली व तिसऱ्या लाटेची चाहूल लागली. जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून जळगाव जिल्ह्यातही रुग्ण वाढू लागले.

जळगाव मनपाचे ११० बेडचे सीसीसी पुन्हा सज्ज
नांदेडकर दक्ष अन् प्रशासन सज्ज

जळगाव हॉटस्पॉट

जळगाव शहर पहिल्या व दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरले होते. ते आता तिसऱ्या लाटेतही तसेच हॉटस्पॉट ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांत जळगाव शहरातील रुग्णसंख्येने पन्नाशी पार केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

कोविड सेंटर सज्ज

याआधीच्या टप्प्यात मनपाने कोविड रुग्णांच्या विलगीकरण व प्राथमिक उपचारासाठी शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इमारती ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू केले. जवळपास ७ इमारती मनपाच्या ताब्यात आजही आहेत. त्यापैकी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाची इमारत कोविड सेंटरसाठी ११० बेडसह सज्ज करण्यात आली आहे. अद्याप याठिकाणी एकही रुग्ण नाही.

जळगाव मनपाचे ११० बेडचे सीसीसी पुन्हा सज्ज
तुम्ही कितीही निर्बंध लावा, आम्ही आमच्या मर्जीनेच वागू!

गरज पडल्यास वाढविणार

दरम्यान, शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यास कोविड सेंटरची गरज पडेल. त्यावेळी आवश्‍यकतेनुसार याच परिसरातील इमारती कोविड केअर सेंटरसाठी सज्ज करण्यात येतील. सध्या एकच इमारत सज्ज केली असून त्याठिकाणी नोडल अधिकारी म्हणून उमाकांत नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तंत्रनिकेतनातील अन्य दोन इमारतींमध्ये कोविडच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()