जळगाव : हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा शेवटचा तीन कोटी रुपयांचा हप्ता महापालिकेने अदा केला आहे. यामुळे ३३ वर्षांनंतर महापालिका संपूर्ण कर्जमुक्त झाली आहे.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात विविध विकासकामांपोटी १९८९ ते २००१ च्या दरम्यान हुडको संस्थेकडून १४१.३४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी महापालिकेकडून नियमितपणे व्याजासह मोठ्या रकमेचा भरणा झाला होता.
तरीही हुडकोचे कर्ज फिटत नव्हते. कर्ज वाढतच होते. अखेर एकरकमी सेटलमेंट ठरवून कर्ज फेडण्याचे मंजूर करण्यात आले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार २५० कोटी ८३ लाख ३८ हजारांची रक्कम व यात दर महिन्याचे तीन कोटी व्याज गृहीत धरून २५३ कोटी ८३ लाख ३८ हजारांचे कर्ज राज्य शासनाने फेडले.
शासनाकडून ५० टक्के रक्कम वसूल
हुडकोच्या कर्जापैकी राज्य शासन महापालिकेकडून ५० टक्के रकम वसूल करणार होती. त्यानुसार १२५ कोटी ४१ लाख ६९ हजारांची रक्कम महापालिकेस देय असलेल्या वस्तू व सेवाकर भरपाई अनुदान (जीएसटी)तून दरमहा तीन कोटींप्रमाणे आक्टोबर २०१९ पासून शासनाने वसूल करण्यास सुरवात केली होती.
त्यानुसार मार्च २०२३ ला अखेरचा तीन कोटी रुपये राज्य शासनाने जीएसटीच्या अनुदानातून कपात केले आहेत. राज्य शासनाकडून महापालिकेला साडेबारा कोटी रुपयांचे जीएसटीचे अनुदान मिळणार होते. त्यात तीन कोटी राज्य शासन कपात करून ९ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळत होते.
या अनुदानातून महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन व उर्वरित रक्कम विकासकामांसाठी खर्च केली जात होती. मात्र, वेतन, पेन्शनवर मोठी रक्कम अनुदानातून खर्च केली जात असल्याने विकासकामांसाठी थोडी रक्कम शिल्लक राहत होती. आता या अनुदानात तीन कोटी रुपये दरमहा वाढणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.