Jalgaon Municipality News : डांबरी रस्त्यावरील अतिक्रमण भुईसपाट

Jalgaon Municipality : शहरातील खराब रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो, तर जरा कुठे चांगला रस्ता झाला तर त्यावर काही वेळातच अतिक्रमण सुरू होते.
Action of Encroachment Removal Department in Devendra Nagar
Action of Encroachment Removal Department in Devendra Nagaresakal
Updated on

Jalgaon Municipality News : शहरातील खराब रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो, तर जरा कुठे चांगला रस्ता झाला तर त्यावर काही वेळातच अतिक्रमण सुरू होते. त्यामुळे पुन्हा वाहतुकीची समस्या निर्माण होते. शहरातील देंवेंद्र नगरात अगदी असेच झाले, नवीन झालेल्या डांबरी रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटली.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर आज महापालिकेने धडक कारवाई करीत अतिक्रमण उखडून टाकले. (Jalgaon Municipal Corporation took action against encroachment)

देवेंद्र नगर भागात अनेक दिवस रस्ते अत्यंत खराब होते. पावसाळ्यात वाहन चालविणे तर कठीणच होते. नागरिकांनी अनेक वेळा मागणी केल्यानंतर महापालिकेकडून डांबरी रस्ता मंजूर झाला. त्याचेही काम मात्र लवकर सुरू झाले नाही. त्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागला. अखेर अनेक दिवसांचा पाठपुरावा आणि आंदोलनानंतर एकदा रस्त्याचे डांबरीकरण झाले.

पण रस्त्यावर डांबरीकरण झाल्यानंतर चांगल्या रस्त्याचा नागरिक आनंद घेत नाही तोच त्यावर अतिक्रमण सुरु झाले. भररस्त्यावर अतिक्रमणामुळे पुन्हा नागरिकांची गैरसोय वाढली. एक रस्त्याची समस्या सुटली तर दुसरी वाहनधारकांच्या गैरसोयीची दुसरीच समस्या उभी राहिली.

नागरिकांची महापालिकेत तक्रार

अखेर त्रस्त झालेल्या देवेंद्र नगरच्या नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करीत अतिक्रमण काढण्याची मागणी करीत उपायुक्तांना निवेदनही दिले. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी या भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

Action of Encroachment Removal Department in Devendra Nagar
Jalgaon News : भवानी मंदिराचा यंदा शताब्दी वर्ष महोत्सव; जिर्णोद्धाराला 100 वर्षे पूर्ण

त्यानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, संजय पाटील, साजीद अली, सतीश ठाकरे पथकातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत रस्त्यावर थाटलेल्या सर्व टपऱ्या हटविल्या आणि रस्ता मोकळा केला.

शाब्दीक वाद

अतिक्रमण हटविताना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अतिक्रमणधारक यांच्यात शाब्दीक वादही झाला. काहीनी अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. मात्र अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

Action of Encroachment Removal Department in Devendra Nagar
Jalgaon News : शासकीय डेपोतून 1 लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार; 600 रुपये दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.