जळगाव महापालिकेचा अतिक्रमणधारकांना ‘अल्टिमेटम’

इच्छादेवी चौक ते डी-मार्ट : स्वत: हून अतिक्रमण काढा; अन्यथा कारवाई
अतिक्रमण
अतिक्रमण sakal
Updated on

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौक ते डी- मार्टपर्यंतच्या रस्त्यावरचे अतिक्रमणाचे मार्किंग करण्यात आले आहे, ते त्यांनी स्वत:हून काढून घ्यावे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त श्‍याम गोसावी(jalgaon carporation Deputy Commissioner shyam gosavi ) यांनी दिली.याबाबत माहिती देताना उपायुक्त गोसावी यांनी सांगितले, की इच्छादेवी चौक ते डी- मार्टपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते, त्यामुळे त्या ठिकाणी रहदारीस अडथळा होत आहे. या रस्त्यावरचे अतिक्रमण(Encroachment ) काढण्याबाबत महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आता महापालिकेच्या नगररचना विभागाच्या माध्यमातून रस्त्यावर मार्किंग करण्यात आले. मार्कींग करण्यात आलेल्या ठिकाणापासून अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

(Jalgaon Municipal Corporation ultimate to encroachers)

अन्यथा कारवाई

नागरिकांनी दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल,यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. ज्या वेळी पोलीस बंदोबस्त मंजूर होईल त्या दिवशी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल. अशी माहितीही उपायुक्त गोसावी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.