Jalgaon Municipality News : शौचालय, सांडपाण्याचे पाईप चेंबर्सला जोडणार; आठवड्यात सुरू होणार काम

Jalgaon Municipality : घरातील शौचालय, बाथरूमचे सांडपाणी चेंबर्सला जोडणी करून ते पाणी शिवाजीनगरातील लेंडी नाल्यावर असलेल्या प्रक्रिया प्रकल्पात एकत्रित करण्यात येणार आहे.
Sewage treatment plant on Lendi drain in Shivajinagar.
Sewage treatment plant on Lendi drain in Shivajinagar.esakal
Updated on

Jalgaon Municipality News : घरातील शौचालय, बाथरूमचे सांडपाणी चेंबर्सला जोडणी करून ते पाणी शिवाजीनगरातील लेंडी नाल्यावर असलेल्या प्रक्रिया प्रकल्पात एकत्रित करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती व दीपनगर थर्मल पॉवर स्टेशनला देण्यात येणार आहे. अमृत टप्पा एक अंतर्गत ही योजना आहे. या प्रकल्पावर विद्युत जोडणीचे काम पूर्ण झाले असून, त्याचे प्रात्यक्षिक सुरू आहे. (work start of Toilet sewage pipe will be connected to chamber )

येत्या आठवड्यात प्रत्येक घरातील शौचालय व बाथरूमच्या सांडपाण्याचा पाईप घरासमोर केलेल्या चेंबर्सला जोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जळगाव शहरात अमृत टप्पा योजना एक अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू होते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून मलनिस्सारण प्रकल्पासाठी प्रारंभ जळगावातील जुन्या रहिवासी भागापासून झाला आहे. यासाठी मक्तेदारामार्फत शहरातील प्रत्येक गल्लीत मोठमोठे चेंबर्स करण्यात आले आहेत. त्या चेंबर्सचे पाईप जोडून ते थेट प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात आले आहेत. घरातील पाईप चेंबर्सला जोडण्यासाठी प्रत्येक दोन घरे मिळून आणखी एक लहान चेंबर्स करण्यात आले आहे.

विद्युत जोडणीसाठी प्रकल्प रखडला

शिवाजीनगरातील लेंडी नाल्यावर विजेवर चालणारा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र विद्युत जोडणी आवश्‍यक होती. त्यामुळे तब्बल तीन वर्षांपासून जोडणीसाठी परवानग्या लागल्या. शिवाय निविदाही काढली होती. अनेक अडचणीनंतर शासनाने परवानगी दिली, तसेच निविदाही मंजूर झाली आणि गेल्या तीन महिन्यांपासून ३.३ केव्हीची विद्युत जोडणी सुरू होती. (latest marathi news)

Sewage treatment plant on Lendi drain in Shivajinagar.
Jalgaon Municipality News : महापालिकेला अभय योजनेत 110 कोटीची वसुली

आता प्रात्यक्षिक सुरू

प्रकल्पावर विद्युत जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता त्याचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. लेंडी नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. आठ दिवस हे प्रात्यक्षिक सुरू राहणार आहे.

शौचालय, बाथरूम पाईप जोडणी

प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतर्फे या प्रकल्पासाठीची जोडणी सुरू होणार आहे. प्रत्येक घरातील शौचालय व बाथरूमचे पाणी वाहून नेणारा पाईप एक ठिकाणी जोडण्यात येईल. त्यानंतर तो पाईप घराबाहेर काढलेल्या लहान चेंबर्सला जोडण्यात येईल. त्याची जोडणी महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकृत प्लंबरतर्फे करण्यात येईल. मात्र, त्याचे साहित्य व जोडणीचा खर्च नागरिकांना करावा लागणार आहे.

अमृत टप्पा एक सुरू होणार

महापालिकेच्या मलनिस्सारण योजनेचा अमृत टप्पा एक या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे. शहरातील ३५ टक्के भागातील शौचालय व सांडपाण्यावर या ठिकाणी प्रक्रिया होणार आहे. यामुळे आता गटारीत वाहणारे सांडपाणी बंद होईल, तसेच प्रत्येक घरातील शौचालयाच्या टाक्या बंद होतील. त्यांचे सांडपाणी थेट चेंबर्समध्ये जाणार आहे. यामुळे भविष्यात शहरातील डास कमी होऊन रोगराई कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

''शिवाजीनगरातील लेंडी नाल्यावर असलेल्या सांडपाणी प्रकल्पाची ३.३ केव्हीची विद्युत जोडणी पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यापासून प्रत्येक घरातील सांडपाणी व शौचालयाचे पाईप चेंबर्सला जोडण्याचे काम सुरू करण्यात येईल. महापालिकेतर्फे नियुक्त प्लंबरकडून हे काम करून घ्यावे.''-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता, महापालिका, जळगाव

Sewage treatment plant on Lendi drain in Shivajinagar.
Jalgaon Municipality News : महापालिकेची विकासकामे रखडली; निवडणूक संपली, परंतु निकालापर्यंत आचारसंहितेमुळे खोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.