Jalgaon Murder: प्रेमसंबंधातून तरुणाने केला विवाहितेचा निर्घृण खून, संशयिताला अटक

Bhusawal Murder: विनोद कुंभार यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सागर कोळीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
murder News
murder News sakal
Updated on

Latest Crime News: तालुक्यातील साकेगाव येथे प्रेमसंबंधातून तरुणाने विवाहित महिलेचा खून केल्याची घटना बुधवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली. सोनाली कोळी (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून, साकेगावात राहत होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित तरुणास अटक करण्यात आली आहे.

सोनाली कोळी ही आपल्या पती व मुलीसोबत साकेगाव येथील भिलाटी क्षेत्रात राहत होती. संशयित सागर रमेश कोळी (वय २८, रा. साकेगाव) याच्या सोबत सोनालीचे प्रेसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनाली व सागर यांच्यात वारंवार भांडणे होत असत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.