जळगाव/यावल : राष्ट्रीय महामार्गावर मुसळी (ता.जळगाव) फाट्यावरील उड्डाणपुलाखाली क्रेटा कारला समोरुन धडक देत, दरोडेखोरांनी कार मधील तिघांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून शस्त्राचा धाकाने लुटलेली १ कोटी ६० लाखांची रोकड पोलिसांनी अवघ्या बारा तासात हस्तगत केली. यात गुन्हेशाखेने दोन संशयीतांना अटक केली असून चौघांच्या मागावर एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. (jalgaon Musli Phata Robbery Case crime marathi news)
गुन्हे शाखेने अनिल बंडा कोळी, दर्शन भगवान सोवणे यांच्यासह डांभुर्णी(ता.यावल) येथून दोन संशयीत ताब्यात घेतले असून चोरीतील ४८ लाखांची रोकड बकरीच्या गोठ्यातून पोलिसांनी ताब्यात घेतली. मुसळी फाटा येथे काल दुपारी अडीचला जिनींगची १ कोट ६० लाखांची रोकड घेवुन जाणाऱ्या कार ला धडक देत दरोडा टाकला होता.
असे लूटले १ कोटी ६० लाख
पिंप्री (ता.धरणगाव) येथील दुर्गेश इम्पेक्स कापुस जिनिंगमध्ये शनिवारी शेतकऱ्यांना कापसाचे पेमेंट करण्यासाठी जळगाव अॅक्सीस बँकेतून १ कोटी ६० लाखांची रोकड घेउन जिनिंग कर्मचारी योगेश पाटील, लेखापाल दीपक महाजन व चालक उमेश पाटील असे तिघे क्रेटा कारने रोकड घेवुन पिंप्री कडे निधाले असतांना मुसळी फाट्यावर उड्डाण पुलाखाली लाल रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक देत, काचा फोडून तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत एक कोटी ६० लाखांची रोकड लूटली होती. (Latest Marathi News)
दरोडेखोरांनी एकदिवस अगोदर फैजपूर येथील शिक्षक दिनेश भानुदास किरंगे यांची इको (एम.एच.१९ एएक्स-.०७९६) व फैजपूर येथील शेख अनिस शेख सत्तार यांची स्कॉर्पिओ (एम.एच.४१-०९९९) शुक्रवारी चोरल्या. दोन घरफोड्याही केल्या. दिवस उजाडल्यावर याच चोरीच्या स्कॉर्पिओतून मुसळी फाट्यावर कारला धडकून १ कोटी ६० लाख लूटले. स्कॉर्पिओ तिथेच सेाडून दरोडेखोर इकोतून पसार झाले.
जेलमधील मैत्रीतून प्लॅन
गुन्ह्यातील संशयितांनी सिकलकर टोळीच्या मदतीने हा दरोडा टाकला. कारागृहात त्यांची मैत्री सिक्कलगर गुन्हेगारांसोबत झाली. त्यातून दुर्गेश इप्रेस जिनिंगद्वारे शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्लॅन झाला. पण अवघ्या १२ तासातच गुन्हशाखेने त्याचा छडा लावून दोन संशयीतांना विदगाव येथून अटक करुन डाभुर्णी येथून रोकड ताब्यात घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.