Jalgaon Holi Festival : मुस्लिम कुटुंब वाढवताय होळीचा गोडवा! साखर महागल्याने हार-कंगणच्या दरात वाढ

Jalgaon News : जळगाव शहरात अमळनेर येथील मुस्लीम कुटुंबीय हिंदू बांधवांना सोबत घेत होळी, गुढीपाडव्यासाठी लागणारे हार-कडे तयार करीत आहे
Female craftsman pouring sugar syrup into a necklace mold & While accumulating the goods of necklace bracelets made at one place.
Female craftsman pouring sugar syrup into a necklace mold & While accumulating the goods of necklace bracelets made at one place.esakal
Updated on

जळगाव : हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी, रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव. होळीसाठी लागणारे हार-कटे (हार कंगण) बनवून त्याची विक्री करण्यास वेग आला आहे.

जळगाव शहरात अमळनेर येथील मुस्लीम कुटुंबीय हिंदू बांधवांना सोबत घेत होळी, गुढीपाडव्यासाठी लागणारे हार-कडे तयार करीत आहे. यामुळे मुस्लिम हिंदू बांधव एकत्र असल्याचे चित्र आहे. (Jalgaon Muslim family raising sweetness of Holi Increase in price of necklaces bracelets due to high cost of sugar marathi news)

यंदा गतवषीच्या तुलनेत साखर सहा रूपयांनी प्रती किलो महागली आहे. यामुळे हारकडयाच्या दरात वाढ झाली आहे. येत्या रविवारी (ता.२४) होळी आहे. होळीला साखरेचा हार घालून पुजा केली जाते. लहान मुलींना साखरेचा हार, तर मुलींना कडे दिले जाते.

गुढीपाडव्याला गुढीला साखरेचा हार कडे घातले जाते. हार कड्यांचा दर सध्या ४० रूपये पावशेर असा आहे. तर किलोचा दर १४० ते १५० रुपये किलो आहे. साखर, कोळसा, दोरा, मजुरीचे दर वाढल्याने हे दर वाढले आहे. होलसेलचे दर ९० ते १०० रुपये प्रती किलो आहेत.

अमळनेर येथील अजिज करीम हलवाई यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासत आहे. हार-कडे बनविण्याचा त्याचा छोटा व्यवसाय हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहे. हा परिवार पाच पिढ्यांपासून मिठाई व्यवसायात आहे. अजिज भाई यांच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे. त्यांची परंपरा त्यांचे आजोबा अमीरभाई यांनी जोपासत त्यापाठोपाठ वडील करीमभाई यांनी व्यवसायात प्रगती केली. (latest marathi news)

Female craftsman pouring sugar syrup into a necklace mold & While accumulating the goods of necklace bracelets made at one place.
Jalgaon Lok Sabha Election: जळगाव जिल्ह्यात 37 लाख 93 हजार मतदार! जळगावमध्ये 19 लाखावर तर रावेरमध्ये 18 लाखावर मतदार

अजीजभाई यांना त्यांची दोन मुले नासीर व आदिल, नातू, अझरहरही मदत करतात. अजिज हलवाईवाले २६ वर्षांपासून येथील कासमवाडीत न्यू मिलन हार कंगण नावाने कारखाना महिनाभरासाठी जळगाव मध्ये उभारतात. एका महिन्याला हजार किलोचा माल येथे तयार होतो. हा माल इतर व्यापारी नेऊन त्याची विक्री करतात.

हिंदू-मुस्लिम कारागीर एकत्र

अजिजभाई यांच्या छोटाशा व्यवसायात हिंदू, मुस्लिम, आदिवासी मजूरही काम करतात. त्यात राम भिल, संजय भिल, गुरूभाउ भिल, दिलबर भिल, निसार पैलवान, मजीद करीम, साजीद मजीद, साबीर मजीद, आदीचा सामावेश आहे. ही मंडळी जातीय भेद न पाळता एकत्र काम करता, 'मजहब नहीं सिखाता., आपस में बैर रखना.. हिंदी है हम, हिंदी है हम..' या उक्तीप्रमाणे एकोप्याने काम करतात.

Female craftsman pouring sugar syrup into a necklace mold & While accumulating the goods of necklace bracelets made at one place.
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया 18 एप्रिलपासून! माघारी नंतर प्रचारास मिळणार 13 दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.