भडगाव : नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पामुळे गिरणा नदीचे कायमस्वरूपी भाग्य उजाडणार आहे. विशेषतः: जळगाव जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यापेक्षा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. मात्र, आता ‘गिरणा’ चे पाणी साठविण्याचे भांड्याची क्षमता वाढविण्यासाठी लालफितीत अडकलेल्या ‘बलून’ बंधाऱ्यांना चालना देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य शासनाने आतापर्यंत केवळ दिवास्वप्न ठरलेल्या नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पाला चालना देऊन खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना दिली आहे. त्यामुळे गिरणा पट्टा हा सुजलाम् सुफलाम् होऊ शकणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शासनाने कालबद्ध पद्धतीने राबवून गती देणे आवश्यक आहे. ( Drinking problem will be solved forever with increased irrigation )