National Voluntary Blood Donation Day: स्वेच्छेने रक्तदान करणारे दहाच दाते! चाळीसगावच येथील रक्तपेढीत दर 3 महिन्यांनी करतात रक्तदान

Latest Jalgaon News : दहाही जण दर तीन महिन्यांनी रक्तदानासाठी स्वतःहून रक्तपेढीत येतात. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनीही रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जीवन सुरभी ब्लड बँकेने केले आहे.
National Voluntary Blood Donation Day
National Voluntary Blood Donation Dayesakal
Updated on

अजय कोतकर : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला महत्त्व दिले जाते. अनेकदा जवळच्या नातेवाइकासाठी धडधाकट असलेले आप्तस्वकीय रक्तदानासाठी मागे पुढे पाहतात. समाजात अजूनही रक्तदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. मात्र, शहरातील दहा जण आजही स्वेच्छाने रक्तदान करतात. यातील अनेकांनी शतक पार केले आहे. दहाही जण दर तीन महिन्यांनी रक्तदानासाठी स्वतःहून रक्तपेढीत येतात. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनीही रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जीवन सुरभी ब्लड बँकेने केले आहे. (Only ten donors willing to donate blood)

राजेश ठोंबरेंचे १३५ वेळा रक्तदान

सर्पतज्ज्ञ राजेश ठोबरे यांनी आतापर्यंत तब्बल १३५ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान केल्याने शरीरात नव्याने रक्त निर्माण होते आणि आपल्या रक्तामुळे इतरांना जीवनदान मिळते. त्यामुळेच मी दर तीन महिन्यांनी रक्तदान करतो, असे ते सांगतात.

त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा तक्षक वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नियमित रक्तदान करतो. तक्षकने आतापर्यंत १५ वेळा रक्तदान केले आहे. तरुणांसोबत महिलांनीही रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले. (latest marathi news)

National Voluntary Blood Donation Day
Students Attendance : हजेरी ‘रजिस्टर’वरच; ‘ॲप’चे काय? यंदाच्या वर्षात अनेक ‘ॲप’ पडले बंद; अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोधच

हे आहेत दहा दाते

स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांमध्ये सर्पतज्ज्ञ राजेश ठोबरे, पंकज पाटील, रोहित रामाणी, प्रीतेश कटारिया, दीपक शुक्ल, सचिन देवकर, विनय जैन (कजगाव), डॉ. राजेश अग्रवाल, भरत पटेल, बाबूलाल सोनवणे या दहा दात्यांचा समावेश आहे.

"रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. नियमित रक्तदान केल्याने रक्त पातळ राहते. यामुळे आजारांना दूर ठेवता येते. वजन कमी करायचे असेल, तर तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करायला हरकत नाही. त्यासाठी तरुणांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून स्वतः रक्तदान करावे." - प्रवीण पाटील, चेअरमन, जीवन सुरभी ब्लड बँक, चाळीसगाव

National Voluntary Blood Donation Day
Jalgaon : नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी सजली बाजारपेठ! दुर्गादेवी मंडळांकडून मूर्तींचे आरक्षण; शहरात गरबा-दांडियाचे प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.