Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सुटेना

Jalgaon : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
ncp
ncp esakal
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या येत्या रविवारी (ता. ७) सकाळी दहाला माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी कार्यालयात मुलाखती घेणार आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, वाल्मीक पाटील, विकास पवार, श्रीराम पाटील, ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी यांची नावे स्पर्धेत आहेत. (NCP district president post is not going away )

यातून कोणाच्या गळ्यात जिल्ह्याध्यक्षपदाची माळ पडते, याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. माजी मंत्री देशमुख रविवारी (ता. ७) सकाळी आठला बॉम्बे समर एक्सप्रेसने नागपूर येथून जळगावला येतील. सकाळी साडेनऊला पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाच्या इच्छुकांची बैठक घेतील. नंतर अकराला खिरोदा येथे (कै.) बाळासाहेब मधुकर चौधरी यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती देतील. (latest marathi news)

ncp
Jalgaon News: राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतुकीची कोंडी! पारोळा येथे वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय झाल्याने तीव्र नाराजी

लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराचा भाजपने दणदणीत पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा बैठक बोलावली. तीत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे संघटन नव्याने बांधण्याची गरज असल्याचे सांगितले.

त्यासाठी ओबीसी किंवा मुस्लिम जिल्हाध्यक्ष देण्याचे त्यांनी विधान केले होते. आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन डॉ. पाटील यांनी हा पत्ता फेकला. जळगावनंतर प्रदेश पातळीवर मुंबई येथे बैठक झाली. तीत जळगाव जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यातील पक्ष संघटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाला नवीन जिल्हाध्यक्ष देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ncp
Jalgaon News : भुसावळ रेल्वेला जूनमध्ये 129 कोटींचा महसूल; डीआरएम इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.