Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा गाजर दाखवून निषेध!

Jalgaon News : ‘केंद्र सरकारचा निषेध असो...’, अशा विविध घोषणा देऊन व गाजर दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महानगरतर्फे केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
NCP (Sharad Chandra Pawar) party officials protesting the central government by showing carrots.
NCP (Sharad Chandra Pawar) party officials protesting the central government by showing carrots.esakal
Updated on

Jalgaon News : ‘अर्थसंकल्पनाचा दोष ‘महाराष्ट्र रोष...’, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले काय गाजर.. गाजर..’, ‘केंद्र सरकारचा निषेध असो...’, अशा विविध घोषणा देऊन व गाजर दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महानगरतर्फे केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवारी (ता. २३) देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. (NCP protest by showing carrot of central government)

अर्थसंकल्प हा देशाचा होता, पण महाराष्ट्र देशात आहे, की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रच्या जनतेला पडला आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला दिलेल्या कमी जागांमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे परिणाम भोगावे लागले, अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे.

आंध्र प्रदेश व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते. की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीही मिळालेले नाही. महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून, आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही. (latest marathi news)

NCP (Sharad Chandra Pawar) party officials protesting the central government by showing carrots.
Jalgaon Road Damage : कजगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प! खड्ड्यांमध्ये अडकले वाहन

राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना लक्षात घेता बुधवारी (ता. २४) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महानगर जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, किरण राजपूत.

शहर संघटक राजू मोरे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष इब्राहीम तडवी, महानगर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, वर्षा राजपूत, कलाताई शिरसाट, लिलाताई रायगडे, राहुल टोके आदी सहभागी झाले होते.

NCP (Sharad Chandra Pawar) party officials protesting the central government by showing carrots.
Jalgaon Kharif season : जिल्ह्यात ‘खरिपा’च्या 92 टक्के पेरण्या पूर्ण! कपाशीचा पेरा 101 टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com