Jalgaon News : लासूरची ऐतिहासिक ‘साखर बावडी’ वाचविण्याची गरज

Jalgaon : लासूर (ता. चोपडा) येथील पुरातन आणि ऐतिहासिक असलेली साखर बावडी आता जीर्ण होत चालली असून, तिला वाचविणे गरजेचे आहे.
An ancient sakharbavdi in the north of the village
An ancient sakharbavdi in the north of the villageesakal
Updated on

Jalgaon News : लासूर (ता. चोपडा) येथील पुरातन आणि ऐतिहासिक असलेली साखर बावडी आता जीर्ण होत चालली असून, तिला वाचविणे गरजेचे आहे. खरेतर ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असून, या विहिरीत पुरातन गणेश मंदिरही आहे. लासूर गावाच्या उत्तर दिशेला सातपुडा पर्वतरांगेच्या पहिल्या रांगेच्या जवळपास ही विहीर असून, पूर्वीच्या काळी ती गावाच्या उत्तरेला वाटत असली, तरी आता ती गावाचा उत्तर भाग झाली आहे. साखरबावडी या नावाबद्दल थोडी उत्सुकता असली, तरी खानदेशातील अहिराणी, गुजराथी व हिंदी मिश्रित वर्णनात विहिरीला ‘बावडी’ असे आजही म्हणतात. (Jalgaon Need to save historical Sakhar Bawdi of Lasur )

अशाप्रकारच्या विहिरी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात भारतभर बऱ्याच ठिकाणी झाल्या. नाशिक जिल्ह्यात गोदावरीच्या काठावरील भागात तर आपल्याकडे बारव (पाय विहिरी) दिसून येतात. त्याच धाटणीची ही विहीर असून, अशा विहिरींना महाराष्ट्रात ‘बारव’ या नावाने ओळखले जाते. ही बारव वर जीर्णोद्धाराने चांगली वाटत असली, तरी ती जुनी होत चालली असून, पुरातत्त्व खात्याने लक्ष देऊन तिची दुरुस्ती करायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे.

ही बारव जुन्या वीट चुन्याची असून, प्रचंड विस्ताराची आहे. ती सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची असावी, असे जुने जाणकार सांगतात. मात्र, तशी नोंद आढळत नाही. त्याच विहिरीत असलेल्या गणेश मंदिराचा विचार करता या गोष्टीला पुष्टी मिळते. उत्तर आणि दक्षिण बाजूकडून प्रत्येकी १८ पायऱ्यांची उतरण उतरल्यावर एक पसरट भाग लागतो. त्यात एक सुंदर गणेशमंदिर असून, भिंतीत साधारणत: आठ फुटात सुंदर चार फुटाची मूर्ती आहे. (latest marathi news)

An ancient sakharbavdi in the north of the village
Jalgaon News : रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण.. स्थानकांचे आधुनिकीकरण; स्थानकांचा ‘लूक’ बदलला

विहिरीतील मंदिर ही एक रंजक कल्पना असून, कर्नाटक राज्याच्या पूर्वेच्या भागात एका खोल विहिरीत अशाच प्रकारचे शिवमंदिर आढळून येते. तसाच काहीसा साम्यदर्शक प्रकार या मंदिराचा असावा. सुंदर अशी ही सुमारे साठ फूट खोल बारव साधारणपणे दोन हजारपर्यंत पाण्याने भरलेली दिसत असे. आताही पावसाळ्यात त्यात काहीसे पाणी येते. मात्र, पाण्याचा खालील भाग दगड मुरमाचा असला, तरी तो कपारल्याने विहीर वर चांगली वाटत असली, तरी खाली मात्र ती पोखरू लागली आहे.

या विहिरीत असलेल्या गणेश मूर्तीचा विचार करता पूर्वीच्या काळी अहिल्याबाई होळकरांनी या मूर्तीची स्थापना केली असावी, असा कयास केला जातो. मुघलकालीन काळात अतिक्रमणाची शक्यता लक्षात घेता मंदिरांची नासधूस होत असे, त्यासाठी विहिरीत हे मंदिर असावे, असा कयास बांधण्यास बराच वाव आहे. वरील भागात गावकऱ्यांनी झाडे जगवत जीर्णोद्धार केला असला, तरी खालील बाजूस वाढणारा धोका लक्षात घेऊन तिच्या जीर्णोद्धाराची गरज आहे.

An ancient sakharbavdi in the north of the village
Jalgaon News : मलकापूरची शेंदोडी पारोळ्यातील भाजी बाजारात ग्राहकांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.