Nepal Bus Tragedy : भाजपचे कार्यकर्ते जखमींच्या सेवेसाठी काठमांडूत तळ ठोकून

Bus Tragedy : भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सहा कार्यकर्ते नेपाळमधील बस दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या सेवेसाठी काठमांडूत तळ ठोकून आहेत.
Nepal Bus Tragedy
Nepal Bus Tragedy esakal
Updated on

Nepal Bus Tragedy : येथील भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सहा कार्यकर्ते नेपाळमधील बस दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या सेवेसाठी काठमांडूत तळ ठोकून आहेत. या घटनेतील १६ जखमी तेथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. नेपाळमधील स्थानिक इंडियन सिटिझन फोरमचे कार्यकर्तेही मदतीसाठी सरसावले आहेत. बस दुर्घटनेतील १६ जखमींना काठमांडूमधील त्रिभुवन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल केले आहे. यात तीन गंभीर आहेत, तर इतरांना कमी-अधिक प्रमाणात इजा झाली असून, काही जण फ्रॅक्चर आहेत. (BJP activists camped in Kathmandu to serve injured )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.