Jalgaon MSEB News : नवीन वसाहतधारक रात्रभर अंधारातच; विजेच्या लपंडावाने त्रास

Jalgaon MSEB : गेल्या सात-आठ दिवसांपासून येथील अमळनेर रस्त्यालगत असलेल्या नवीन वसाहतींमध्ये अर्ध्या-अर्ध्या तासात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
MSEB News
MSEB Newsesakal
Updated on

Jalgaon MSEB News : गेल्या सात-आठ दिवसांपासून येथील अमळनेर रस्त्यालगत असलेल्या नवीन वसाहतींमध्ये अर्ध्या-अर्ध्या तासात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. या विजेच्या लपंडावामुळे नवीन वसाहतीमधील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर काम व रात्री वीज नसल्यामुळे जागरण करीत डास व उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ( new colonies power supply is frequently interrupted )

त्यामुळे वीज महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळा होता तेव्हा वीज भारनियमनच्या नावाने बऱ्याच वेळा या भागातील वीजपुरवठा खंडीत होत होता. मात्र, आता पावसाळा सुरू होऊनदेखील किंवा वातावरणात वादळवारा, पाऊस नसतानादेखील दिवसा व रात्रीच्या वेळी नवीन वसाहतींमध्ये तासनतास वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असतो.

त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वीज बिल देयके वेळेवर भरूनदेखील महावितरण कंपनीकडून नवीन वसाहतीधारकांना नियमितपणे वीजपुरवठा केला जात नाहीये. त्यामुळे येणारे वीजबिल भरायचे की नाही, असा प्रश्‍नही आता येथील रहिवाशींमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, पारोळा शहरात वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणामुळे रुंद झालेले रस्ते, सर्वत्र अस्वच्छता, त्यामुळे शहरातील अनेक रहिवाशी यांनी गावातील स्वतःचे घर सोडून भाड्याने अथवा स्वतः घर बांधून अथवा बैठे खरे विकत घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नवीन वसाहतीमध्ये राहणे पसंत केले. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसतानादेखील रहिवाशी या परिसरात समाधान मानून राहत आहेत. (latest marathi news)

MSEB News
MSEB News : ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट; 24 तास सुविधा

मात्र, पिण्याच्या पाण्यापेक्षा विजेची समस्या या नवीन वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे वीज महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराबाबत स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी (ता.१८) रात्रीही तब्बल सात ते आठ वेळा या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला.

त्यामुळे स्थानिक रहिवाशांना संपूर्ण रात्रभर डास व उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. याबाबत संबंधित‌ वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, वीजवाहिनीत नेमका कोणत्या भागात तांत्रिक बिघाड झाला, ते शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अन्‌ विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

पारोळा येथील अमळनेर रस्त्यालगतच्या या नवीन वसाहतींमध्ये मंगळवारी रात्रभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे रहिवाशांसह त्यांच्या पाल्यांची झोपच उडाली. पहाटे चारला वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना झोप लागली. मात्र, रात्रभर जागरण झाल्याने सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी नवीन वसाहतीमध्ये शाळा असूनदेखील जागरणामुळे शाळेला दांडी मारल्याचे दिसून आले.

रोजच अशी परिस्थिती राहिली, तर नवीन वसाहतीमधील नागरिक वीज कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत वीज अभियंत्यांशी संपर्क साधला असता, शहरात मोठ्या प्रमाणात वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने नवीन वसाहतींसह शहरातदेखील वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.

MSEB News
Jalgaon MSEB : घरगुती वीज दरात 35 ते 50 रुपयांची वाढ; वीज वितरण कंपनीचा या महिन्यापासून दरवाढीचा शॉक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com