भडगाव : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पामुळे गिरणा खोऱ्यात ५० हजार हेक्टर ओलिताखाली येऊ शकणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ३२ हजार ४९२, तर जळगाव जिल्ह्यातील १७ हजार २४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे हा प्रकल्प समृद्धीचे नवीन दालन खुले करणारा ठरणार आहे. गिरणा धरण निम्म्या जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. (New corridor of irrigation prosperity will be opened benefiting 50 thousand hectares )