Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा नवा आदेश जारी; आता योजना अधिक सुलभ

Jalgaon News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Jalgaon News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचे यशस्वी अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीसेविका, एनयुएलएमचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्षप्रमुख, सीएमएम (सिटी मिशन मॅनेजर). (Ladki Bahin Yojana)

आशासेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्रांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतियशस्वी पात्र लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

परराज्यात जन्म झालेल्या व त्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व मतदान कार्डही ग्राह्य धरण्यात येणार आहे. पोस्टात बँक खातेही ग्राह्य धरणात येणार आहे.

या योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडीसेविका, एनयूएलएमचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्षप्रमुख व सीएमएम आशासेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत केले आहे. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पीएफएमएस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील.

त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार आथेंटीकेशन यापूर्वीच झाल्याने त्या लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या योजनेचा थेट लाभ द्यावा, असे आदेशित केले आहे.

Ladki Bahin Yojana
Jalgaon News : वीजजोडणी राहिलेल्या पाणीयोजना सुरू करा; मंत्रालयात झालेल्या जलजीवन आढावा बैठकीत मंत्री पाटील यांचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.