Jalgaon Fraud News : मौजे बोदवड, मौजे जिन्सी येथील शेती प्रकरणाच्या नजराणा भरण्याबाबत तहसीलदारांच्या बानावट स्वाक्षरीने निम्मे नजराण्याचे पत्र जोडून शासनाची लाखो रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ‘महसूल’मधील अनेकांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी सुटी असूनही संबंधितांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली. (defrauding government of lakhs of rupees with forged signature of Tehsildar)
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत कार्यरत तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून यासारखी आणखी काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फिर्यादीत दोन प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात (ता.६-१०-२०-२३ ते६-०२-०२-२०२४) दरम्यान मौजे बोदवड (ता.मुक्ताईनगर) येथील गट नं.१९६/५ (क्षेत्र०.८१ हेक्टर आर.आकार ३.२५) नवीन अविभाज्य शर्तीच्या जमीनीचे भोगवटा वर्ग खेमा वाघ (रा.जळगाव) यांनी लेखी अर्ज दिला हेाता.
या अर्जाला अनुसरुन बाजारभावाच्या मुल्यांकन रकमेच्या ७५ टक्के रक्कम (३ लाख २६ हजार २५२) नियमानुसार भरण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले हेाते. त्यानंतर अर्जदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पत्र(जमीन२/२६/न अश इंटपाल/२०२२/९५०२३) हे (ता.३ नोव्हेंबर२३) बाजारभावाच्या मूल्यांकन रकमेच्या ५० टक्के रक्कम (२ लाख २४ हजार१६३) इतके भरण्याचे पत्र देण्यात आल्याचे आढळून आले.
त्याचप्रमाणे अर्जदार यांना भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करुन कृषक प्रयोजनार्थ विक्रीची परवानगीचे पत्र देण्यात आले. या दोन्ही पत्रावर तहसीलदार पंकज लोखंडे यांची स्वाक्षरी असल्याने तत्काळ महसुल विभागाने लोखंडे यांना लेखीपत्राद्वारे कळवून शहनिशा करण्यास (बदली झालेल्या नंदुरबार येथून) पाचारण केले होते. (marathi news)
ऑनलाईन प्रकरणात ऑफलाईन स्वाक्षरी
त्याच प्रमाणे मौजे जिन्सी (ता.रावेर) येथील गट नं.११९/७ मधील जमीन अर्जदार राजू निंबा अटकाळे, श्रावण निंबा अटकाळे,सिताबाई प्रल्हाद धुरंधर, तापाबाई लालू ,शांताबाई निंबा अटकाळे (रा.जिन्सी.ता.रावेर) यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-ऑफिस कार्यप्रणातील संचिका (computer-no.१६७२७३) प्रलंबित असताना देखील त्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने तहसीलदार पंकज लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करुन आदेश निर्गमीत झाल्याचे आढळून आले आहे.
झारीतील शुक्राचार्य कोण?
तरी, (ता.२३ ऑक्टोबर २३ ते २ फेब्रुवारी २४) या कार्यकाळात जमीन-२ संकलन महसुल शाखा येथील गजानन नरोटे यांचे कडे मौजे जिन्सी (ता.रावेर)आणि मौजे बोदवड या दोन्ही प्रकरणात नविन अविभाज्य शर्तींच्या जमिनीचे भोगवटा वर्ग-१ मध्ये रुपांतर करुन कृषक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळण्याकामी केलेल्या अर्जाच्या परवानगी पत्रावर तसेच विक्री परवानगी आदेशावर तहसीलदार पंकज लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करुन शासनाच्या महसुली रकमेचे नुकसान करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली.
बोदवडच्या प्रकरणात २ लाख २४ हजार तर जिन्सी येथील प्रकरणात १ लाख ४१ हजारांचा नजराणा बुडाल्याचे समोर आले आहे, म्हणून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात महसुल सहाय्यक गजानन नरोटे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वच नोंदी तपासणार
संबंधितांच्या जमिनीवरील नियमानुसार होणाऱ्या नजराण्याची रक्कम खूप जास्त असते, ती कमी करुन मिळण्यासाठी काही जमीन मालक ‘महसूल’मधील घटकांना हाताशी धरुन अशी नियमबाह्य कामे करुन घेतात. यासारखी आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकीकडे या प्रकरणात संशयित असलेल्या सहाय्यकाचे दप्तर तपासले जात असताना या विभागातील अन्य नोंदीही तपासल्या जाणार असून, त्यातून मोठे ‘घबाड’ समोर येईल, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.