Jalgaon News: डेराबर्डी ते करगाव रस्त्याची चाळण, ग्रामस्थांची गैरसोय; रस्ता दुरुस्तीची मागणी

Bad condition of road in Khirdi-Bhati area.
Bad condition of road in Khirdi-Bhati area.esakal
Updated on

चाळीसगाव : येथील डेराबर्डी ते करगाव तांडा क्रमांक एक, दोन, तीन व चार तसेच लांबे वडगाव व रहिपुरी आदी प्रत्येकी दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या तांडे तसेच तीन ते चार हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले लांबे वडगाव व रहिपुरी या खेड्यांवर जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच झालेला नाही. या रस्त्यावरील खडी अक्षरशः निघून वर आल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

Bad condition of road in Khirdi-Bhati area.
Jalgaon News: तळणी परिसरासह खुल्या भूंखंडांचा विकास होणार - आमदार किशोर पाटील

राज्य सरकारचे ‘गाव तेथे रस्ता’ असे धोरण असतानाही तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींना या रस्त्याचे काम करावे, त्या भागातील रहिवाशांना चांगला रस्ता तयार करून द्यावा, असे कधी वाटलेले नाही.

केवळ लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी राजकीय नेतेमंडळी त्या रस्त्यावरून जातात. दुरुस्तीचे आश्‍वासन देतात. निवडणुका संपल्या की पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. हा रस्ता अत्यंत जुना असून मोठया प्रमाणावर रहदारीचा आहे.

या रस्त्यावर आयुर्वेदीक महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या उद्‌घाटनासाठी व महाराष्ट्र माळी परिषदेसाठी ७ जून २००१ ला माजी मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले होते.

Bad condition of road in Khirdi-Bhati area.
Jalgaon News: भेंडीसह भाजीपाल्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार; दररोज 70 लाखांची उलाढाल

त्यानंतर २००९ ते २०१४ मध्ये राजीव देशमुख हे आमदार असताना त्यांनी आमदार निधीतून डांबरीकरण केले होते. त्यानंतर आजपावेतो या रस्त्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. सद्यःस्थितीत या रस्त्यावरील संपूर्ण खडी निघालेली असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता धुळे- चाळीसगाव रस्त्यावर असून, डेराबर्डीपासून या रस्त्याला सुरुवात होते.

त्यावर महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक मंडळ व किसान ज्ञानोदय मंडळ या दोन शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा वापर मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर असतो. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपांच्या मागून ते करगाव गावापर्यंत असलेला दोन किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

Bad condition of road in Khirdi-Bhati area.
Jalgaon News : महसूल विभागाची 42 कोटींची वसुली रखडली! संपामुळे अनेक फाईली अडकून

करगावच्या चारही तांड्यांची रहिवाशांची रहादारी व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. केवळ रस्ता खराब असल्याने वाहनांचे अपघात देखील झालेले आहेत.

दरम्यान, या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते मुंबईला अधिवेशन असल्याचे समजले. त्यांनी मागील महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी टाकला असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.