Jalgaon News : महापालिकेने पाच टक्के निधी दिव्यांग विकासासाठी खर्च करावा असा शासनातर्फे आदेश आहे. मात्र महापालिकेकडून निधी खर्च केला जात नसल्यामुळे दिव्यांग सेनेतर्फे महापालिकेसमोर मंगळवारी (ता.२०) आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. (Movement of disabled people in front of Municipal Corporation)
दिव्यांग सेनेच्या राज्य सचिव भरत जाधव यांच्या नेतृत्वात दिव्यांगानी हे उपोषण केले होते. महापालिकेकडून सन २०२३-२४ चा दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी जळगाव महापालिकेकडून वितरित करण्यात आलेला नाही.
सदर निधी मिळावा म्हणून उपायुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु अद्यापपर्यंत निधी मिळालेला नाही, म्हणून दिव्यांगाकडून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.
आंदोलनप्रसंगी 'प्रत्येक दिव्यांगाला १२ हजार रुपये मिळावे,' अशी मागणी दिव्यांगाकडून करण्यात आली. उपोषणाप्रसंगी दिव्यांग सेनेचे राज्य सचिव भरत जाधव, अक्षय महाजन, हितेश तायडे, तौसिफ शाह, मुजोहिद पिंजारी, नितीन सूर्यवंशी यांच्यासह मोठ्याप्रमाणात दिव्यांग उपस्थित होते.
सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याबाबत आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.