Jalgaon News : ओंकारेश्वर मंदिर बनणार ‘स्पेशल कॉरिडोर तीर्थस्थान’

Jalgaon : शहरासह जिल्ह्यात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जयनगरातील ओंकारेश्‍वर मंदिराच्या कायापालट वेगात सुरू आहे.
Jalgaon Ongoing beautification of Omkareshwar temple.
Jalgaon Ongoing beautification of Omkareshwar temple.esakal
Updated on

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जयनगरातील ओंकारेश्‍वर मंदिराच्या कायापालट वेगात सुरू आहे. ओंकारेश्‍वर मंदिर ट्रस्टतर्फे मंदिराचे दोन सिंहाच्या मुर्तीचे प्रवेशद्वार बनविले जात आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, सुंदर तयार करून त्यात कारंजे, बसण्यासाठी आकर्षक बेंचेस, भजन, कीतर्नासाठी मोठे ‘डोम’ उभारण्यात येत आहे. मंदिर लवकरच एका वेगळ्या रुपात साकारले जात असून ‘विशेष कॉरिडोर धाम’ म्हणून ते तयार होतेय. (Omkareshwar Temple to become Special Corridor Pilgrimage)

१९६५ मध्ये जयनारायण ओंकारदास जोशी, शिवराम जोशी, मिश्रीलाल जोशी, पन्नालाल जोशी, मोहनलाल जोशी या बंधूनी श्री ओंकारश्‍वर चरिटेबल ट्रस्टची स्थापना करून मंदिराची निर्मिती केली होती.

अशी आहे आख्यायिका

मिश्रीलाल जोशी हे ‘पोटशूळ’च्या आजाराने त्रस्त होते. आजाराला कंटाळून मिश्रीलाल यांनी संन्यास घेत काशीला गेले. गुरूबंधू म्हणून जासवंत सिंग भेटल्यानंतर मिश्रीलाल यांचे मतपरिवर्तन करून काशीत राहण्याची गरज नसल्याचे सांगीतल्याने ते जळगावला परत आले.

त्यांच्या इतर बंधूनी मिश्रीलाल यांचा पोटशूळ आजार जावा यासाठी आम्ही ‘ओंकारेश्‍वर मंदिर बांधू’ असा संकल्प केला होता. त्यानंतर जयनगर परिसरात २८ हजार ५०० चौरसफूट जागेत मंदिर मंदीर ८ फेब्रुवारी १९७० ला श्री शिवशंकराची मुर्ती, शिवलिंग, गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

चंद्रीकेश्‍वर, नंदीकेश्‍वर यांचीही प्राणप्रतिष्ठा झाली. मूर्ती जयपूर येथून आणण्यात आल्या आहेत. शंकराच्या मंदिराला अर्धीच प्रदक्षिणा मारतात. मात्र, या ओंकारेश्‍वर मंदिरा चंद्रीकेश्‍वर, नंदकेश्वर प्राणप्रतिष्ठा झालेली असल्याने अभिषेकाचे तिर्थ नंदिकेश्वर, चंद्रीकेश्वर प्राशन करतात. यामुळे या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारली जाते.

Jalgaon Ongoing beautification of Omkareshwar temple.
Jalgaon News : बहुजन ताकद एकवटण्यासाठी राज्यभरात रॅली : राजापूरकर

सुशोभीकरण वेगाने

कोरोना काळात मंदिराचा सुवर्ण महोत्सव होउ शकला नाही. आता मात्र विस्तार व परिसर सुशोभिकरण वेगात सुरू आहे. मकराना येथून संगमरवरी दगडाचे दोन सिंह करून आणले आहे. ओंकारेश्‍वराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवून त्याचे ‘सिंहद्वार’ नामकरण करण्यात आले.

व्हिएतनाम मार्बलचे सिंह सिक्रापूर, बक्षीहाडपूरा येथून संगमरवरी फरशा, ओम व कमळ चिन्हाच्या जाळ्या बसवून मंदिराची शोभा वाढविली जाणार आहे. कारंजे, बसण्यासाठी बाकांची तयार सिस्टम आणून बसविली जाणार आहे. मुरादाबाद (यू.पी.) येथून पितळी, ब्रासचा रेलींग, कठडा आणण्यात येणार आहे.

‘डोम’ची निर्मिती

मंदिरात नेहमी भजन, कीर्तन, कथा होतात. त्यासाठी आकर्षक असा डोम तयार करण्यात येत आहे. भजनी मंडळी, भाविक यात बसून भजन, कीर्तन करू शकतील. मंदिराचे विश्‍वस्त जुगलकिशोर जोशी, जितेंद्र जोशी, दीपक जोशी आदी विश्‍वस्तांच्या नियंत्रणाखाली हे काम होत आहे. मंदिराचे सुशोभिकरणाचे काम आगामी तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल. आगामी श्रावण महिन्यात मंदिर व परिसर अत्याधुनिक सुशोभीकरणाने युक्त असेल.

आज वर्धापनदिन

श्री ओेंकारेश्‍वर मंदिराचा मंदिराचा ५३ वा वर्धापनदिन गुरुवारी (ता.२२) आहे. श्री विश्‍वकर्मा जयंती व गुरुपुष्यामृत योगाच्या पर्वावर मंदिराचा वर्धापन सुवर्णयोग आला आहे. त्यानिमित्त दिवसभर धार्मीक कार्यक्रम होणार आहेत.

रुद्राभिषेक, पूजन आरती, पुण्याहवाचन, गणपती पूजन, द्वारपूजन, वास्तुपूजन, मंदिर परिसरात वृक्षपूजन, आदी कार्यक्रम होतील. विशेष रुद्राभिषेक होऊन अभिजित मुहूर्तास १०८ निरंजनींद्वारे महाआरती होईल. दुपारी लघुरुद्राभिषेक, सायंकाळी १०८ निरंजनींद्वारे महाआरती होईल.

Jalgaon Ongoing beautification of Omkareshwar temple.
Jalgaon Municipality News : शीतल कलेक्शन इमारतीच्या पार्किंगचा तिढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.