Jalgaon News : जिल्हा प्रशासनातर्फे जून २०२३ पासून बंद असलेली वाळूची विक्री येत्या फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. पाचपैकी ठेका दिलेल्या चार घाटावरील सुमारे १६ हजार ब्रास वाळूचा साठा उपलब्ध होणार आहे. शासकीय सहाशे रुपये ब्रास दराने ही वाळू उपलब्ध होणार आहे.
यावल व धरणगाव तालुक्यातील खासगी बांधकाम व्यावसायिकांसह शासकीय ठेकेदारांचा या साठ्याचा लाभ होणार आहे. (Jalgaon sale of sand by district administration will start)
तापी आणि गिरणा नदीवरच्या सात वाळू घाटासाठी निविदा दिल्या गेल्या. पाचपैकी केवळ पथराळे (यावल), नांदेड (धरणगाव) या दोनच डेपोसाठी निविदा प्राप्त झाल्या. पथराळे डेपोवर थोरगव्हाण, पथराळे व शिरागड या घाटांवरुन अनुक्रमे ३५९४, ३५८१ व ३६६४ ब्रास साठा उपलब्ध होईल.
बांभोरी (धरणगाव), उत्राण (एरंडोल) व पिंप्री (यावल) या तीन डेपोसाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. बांभोरीचा डेपो पाळधीत असणार आहे. या घाटावरून २ हजार ५४४ ब्रास वाळूसाठा उपलब्ध होणार आहे.
उत्राणच्या घाटावरून १ हजार ८५५ ब्रास साठा उपलब्ध होणार आहे. त्याचा डेपो उत्राणलाच असेल. तर पिंप्री घाटाचा डेपो तिथेच असणार आहे. १ हजार ८८० ब्रास वाळूसाठा उपलब्ध केला जाणार आहे.
पाळधी बायपास महामार्गावर असणाऱ्या तीन पुलांसाठी २५ हजार ब्रास गौण खनिज जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केले आहे. संबंधित ठेकेदाराने सध्या ५ हजार ब्रासची मागणी केली आहे. तर २५०० ब्रास गौण खनिजापोटी १५ लाखांचा भरणा केला आहे. प्रतिब्रास ६०० रुपयांचा शासकीय दर आकारण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.