Jalgaon News : जिल्ह्यातील वीटभट्ट्या होणार ‘सील’; इंधन म्हणून ‘गॅस’चा वापर आवश्‍यक, वर्षभराची मुदत

Jalgaon : प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातील विटभटट्यांत वापरला जाणारा कोळसा, लाकडांचा वापर बंद करून वीट तयार करताना त्याऐवजी ‘गॅस’चा वापर करावा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वन जलवायू परिवर्तन मंत्रालयाने काढले आहेत.
brick kiln
brick kilnesakal
Updated on

Jalgaon News : देशात आज वायु प्रदूषणाचा विषय गंभीर होत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे हवेत प्रदूषणाचे थर दिसून आल्याचे पाहिले. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभाग कार्यरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातील विटभटट्यांत वापरला जाणारा कोळसा, लाकडांचा वापर बंद करून वीट तयार करताना त्याऐवजी ‘गॅस’चा वापर करावा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वन जलवायू परिवर्तन मंत्रालयाने काढले आहेत. (To prevent pollution brick kilns in jalgaon district will be sealed)

जळगाव जिल्ह्यातही हा आदेश लागू झाला आहे. जिल्ह्यातील वीट भटटी चालकांनी आगामी वर्षभरात वीट तयार करताना कोळसा, लाकडाचा वापर पूर्ण बंद करावा, अन्यथा विटभट्टया सिल’च्या कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण विभागाला देण्यात आले आहेत.

पावसाळा संपताच नवीन भट्टया सुरू होतात. विट भटट्यांचा सिझन मे-जून अखेरपर्यंत सुरू असतो. शहराबाहेर, गावाबाहेर वीट भट्टी चालक मातीद्वारे विटा करून त्या पक्क्या होण्यासाठी भट्टीत भाजतात. कोळसा, लाकडाचा वापर करून इंधन तयार केले. जे विटभट्टीतील सर्व विटांपर्यंत पोचते.

किमान सहा ते आठ दिवस भट्टीतील विटा तयार होण्यास लागतात. तेवढे दिवस कोळसा लाकूड वापरून भट्टी पेटलेली असते. त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होउन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्या परिसरातील नागरिकांच्या फूफूसे निकामी होते, विविध प्रकारचे आजार आणि व्याधी प्रदूषणापासून होतात. असा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे.

brick kiln
Jalgaon News : कपाटाचे कुलूप तोडून ग्रामसेवकाला पदभार

४ हजार वीटभट्यांचा प्रश्‍न

यामुळेच देशभरात या कोठेही वीटभट्टीत इंधन म्हणून कोळसा, लाकडाचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी गॅसचा वापर करावा. सोबतच ‘झिगजॅक व व्हर्टीकल विटभटट्या असाव्यात, असे निर्देश आहेत. २३ फेब्रूवारी २०२४ पासून हे आदेश लागू होतील.

त्याची अंमलबजावणी फेब्रूवारी २०२५ पर्यंत करण्यास मुदत आहे. त्यानंतर मात्र तपासणी होइल. ज्या वीटभट्टयात सुधारित आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाईच्या सुचना आहेत. जिल्ह्यात सुमारे चार हजारांवर वीटभटट्या आहेत.

"वीटभट्यात इंधन म्हणून कोळसा, लाकडा ऐवजी ‘गॅस सिलिंडर’ वापरावे. वीटभट्टी झिकझक, व्हर्टीकल पध्दतीने तयार कराव्यात, अशा सूचना पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने दिल्या आहेत. एक वर्ष मुदत नवीन उपाययोजनांसाठी आहे. उपाय योजना न वीज भटटी चालकांवर कारवाई होईल." - करणसिंग राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी म.रा.प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव.

brick kiln
Jalgaon Municipality News : शहरात लवकरच अतिक्रमण निमूर्लन मोहीम : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.