Nitin Gadkari Jalgaon Daura : देशात रामराज्य, शिवशाही आणण्याचे ध्येय : नितीन गडकरी

Political News : भाजप व महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थ मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.
Union Minister Nitin Gadkari speaking at a rally held on Friday to campaign for BJP candidate Smita Wagh.
Union Minister Nitin Gadkari speaking at a rally held on Friday to campaign for BJP candidate Smita Wagh.esakal
Updated on

Nitin Gadkari Jalgaon Daura : देशातील शेतकरी अन्नदाता नव्हे, तर इंधनदाता झाला पाहिजे. तंत्रज्ञानाने प्रगत झाला पाहिजे. देश जगातील मोठी आर्थिक अर्थव्यवस्था बनवायाची आहे. त्यामुळे केवळ राममंदिर बांधून होणार नाही, तर देशात रामराज्य व शिवशाही आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत रस्ते व परिवहन मंत्री नेते नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. (Jalgaon Nitin Gadkari Daura statement)

भाजप व महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थ मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाराबव पाटील, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, मनसेचे नेते अभिजित पानसे उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, की निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, देशाचे भविष्य ठरविणारी निवडणूक आहे. जगात कम्युनिस्ट विचारधारा संपली आहे. चीनसारख्या देशांनी अमेरिकेची आर्थिक विचारधारा स्वीकारली आहे. समाजवादी विचारधारा संपली आहे.

कॉंग्रेसने पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केली. आता राहुल गांधी आले आहेत. त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला, वीस कलमी कार्यक्रम आणला. मात्र, देशाचा आवश्‍यक तो विकास ते साध्य करू शकले नाहीत.

कॉंगेसने आपल्या ६० वर्षांच्या काळात जे केले नाही, ते मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दहा वर्षांत करून दाखविले. भाजपषाने पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाील आर्थिकदृष्ट्या मागासलेले, गरीबांना अन्न, वस्त्र व निवारा कसा देता येईल, याचा विचार केला. या आधारावरच सामाजिक व आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने मांडले. (latest marathi news)

Union Minister Nitin Gadkari speaking at a rally held on Friday to campaign for BJP candidate Smita Wagh.
Eknath Khadse News : लोकसंपर्क अन्‌ विकासकामांची मालिका हीच ‘खडसें’ची पुंजी : एकनाथ खडसे

शेतीला महत्त्व

कॉंग्रेसच्या काळात शेतील महत्त्व न दिल्याचा आरोप करून गडकरी म्हणाले, की आम्ही शेतीला महत्त्व दिले. देशात गहू, तांदूळ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकविला आहे. तो शेतकऱ्यांना ठेवण्यासाठी जागा नाही. मात्र, आमच्या सरकारने इंधन धोरण स्वीकारले.

आता शेती उत्पादनातून इंधन बनविले जात आहे. शुगरकेन ज्यूस पसूनही इंधन तयार होत आहे. बांबूपासून इथेनॉल तयार करून ते इंधन म्हणून वापरले जात आहे. आगामी काळात पेट्रोल, डिझेलपंप बंद होतील व आमच्या शेतकऱ्यांच्य शेती उत्पादनापासून बनविलेले इंधन सर्वच ठिकाणी वापरले जाईल.

त्यामुळे आमचा शेतकरी जगातील शेतकऱ्यापेक्षा अधिक समृद्ध होईल, याचा आपल्याला विश्‍वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांच्या धोरणानुसार राज्य करण्याचे आपले ध्येय आहे. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलण्याच्या विरोधक अफवा उठवीत आहेत. संविधान कधीच बदलविता येणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, स्मिताताई वाघ, सरिता कोल्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. मुकुंद मेटकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या मंगला बारी यांनी ‘भाजप’त प्रवेश केला. त्यांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

५० लाख कोटींची केली कामे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की देशात पैशांची, तसेच तंत्रज्ञानाची कमी नाही. केवळ इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. आपण देशात ५० लाख कोटींची कामे केली. मात्र, कधीही भडवेगिरी केली नाही. आपल्याकडे येण्याची कुणाची कधीच हिंमत झाली नाही.

Union Minister Nitin Gadkari speaking at a rally held on Friday to campaign for BJP candidate Smita Wagh.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांची जुगलबंदी! टोलेबाजीमुळे चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.