Jalgaon NMU News : बी.एस्सी. कॉम्प्युटरसह बीसीए प्रवेशसंख्या वाढ; ‘उमवि’च्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीसीए व बी.एस्सी. (कॉम्प्युटर) या शाखेत प्रवेशसंख्या वाढविण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व युवासेनेची मागणी मान्य करण्यात आली असून, त्यानुसार दोन्ही शाखांमध्ये प्रवेशसंख्या वाढविण्यात आली आहे. (jalgaon nmu news Increase in number of BSc computers and BCA admission )

या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बी.सी.ए. व बी.एस्सी. (कॉम्प्युटर) या दोन्ही शाखांसाठी विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता, जागा वाढवून देण्याची मागणी केली होती. तसेच युवासेनेने यासंदर्भातील शुल्क कमी करण्यासाठीही पाठपुरावा केला होता. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांची भेट घेऊन त्यांना या दोन्ही मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

त्यानुसार कुलगुरूंनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार २० टक्के प्रवेश संख्येत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : ‘उमवि’त कौशल्य विकासाचे 67 नवीन कोर्सेस; ‘एमकेसीएल’शी सामंजस्य करार

पण जाहीर झालेल्या परिपत्रकात विद्यापीठ मान्यताप्राप्त विद्यार्थी संख्येपेक्षा अतिरिक्त विद्यार्थी संख्या २० टक्के घेण्याची परवानगी दिली असून, ते सर्व प्रवेश प्रतिविद्यार्थी अतिरिक्त संलग्नता शुल्क म्हणून ट्यूशन शुल्काच्या ५० टक्के एवढी रक्कम विद्यापीठास अदा करण्याच्या अटीवर दिली आहे.

शुल्कही केले कमी

तसेच बी.सी.ए. व बी.एस्सी कॉम्प्युटर प्रवेशासाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त संलग्नता शुल्क सहा हजार रुपयांवरून ६०० रुपये करण्यात आले आहे. या मागण्या मान्य केल्याबद्दल युवासेनेचे विराज कावडीया, हरीश माळी, सोनी सोनार, राष्ट्रवादी युवकचे रिंकू चौधरी यांनी कुलगुरूंचे आभार मानले आहेत.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; अभ्यासकेंद्र मान्‍यतेसाठी 26 पर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.