Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीए, बीएमएस, बीएमएस (ई-कॉमर्स), बी.सी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), एम.एम.एस.(पर्सोनेल मॅनेजमेंट), एम.सी.ए. (Integrated) व एम.बी.ए. (Integrated) या वर्गांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसरी केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा १० ऑगस्टला केसीई सोसायटीचे आयएमआर महाविद्यालयात होणार आहे. (jalgaon nmu news Management Science Entrance Exam on 10th August)
त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) ५ ऑगस्टपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर भरण्याची अंतिम मुदत ८ ऑगस्टपर्यंत आहे.
प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशपत्र ९ ऑगस्टला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रक्रिया शुल्क ऑनलाईन नेट बँकिंग व आणि ‘युपीआय’द्वारे भरायची आहे. ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्ज व फी भरल्याची पावती विद्यार्थ्यांनी स्वत:कडेच ठेवायची आहे. भरलेला अर्ज विद्यापीठ किंवा महाविद्यालयात जमा करायचा नाही.
केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अंतिम असून, त्यानंतर पुन्हा परीक्षा होणार नाही. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा. ए. पी. डोंगरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.