Jalgaon News : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या केळी पीकविम्याच्या नुकसान भरपाईचे दावे फेटाळल्याचे समोर आले आहे. मात्र, प्राप्त दाव्यांमधून बहुतांश दावे मंजूर होऊन जे दावे नामंजूर करण्यात आले, त्यात संबंधित क्षेत्रावर केळीची लागवडच आढळून आली नसल्याचे धक्कादायक तथ्य विमा कंपनीच्या सर्वेक्षणाच्या अहवालातून उघड झाले आहे. यासंदर्भातील दावे योग्य असतील आणि अशा केळी उत्पादकांवर अन्याय होत असेल, तर त्यांच्या दाव्यांबाबत लवकरच राज्याच्या कृषिमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. (no banana cultivation in claimed insurance area Company Report)