Jalgaon Water Scarcity : पाणी टंचाईच्या झळा सुरू; 22 गांवाना 26 टँकरने पाणी

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात तापमानासोबत टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत आहे. २२ गावांना २६ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
Water Scarcity (file photo)
Water Scarcity (file photo) esakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात तापमानासोबत टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत आहे. २२ गावांना २६ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. धरणातील पाणी साठा कमी होत असून नगरपालिका, नगरपरिषदांना पाणी कपातीचे व पुरवठ्याच्या दिवसात वाढ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ८० टक्के साठा असल्याने जळगावकरांना पाण्याची चिंता नसल्याची चिन्हे आहे. (Jalgaon number of water scarce villages in district is increasing)

यंदा जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नसली तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यात १७ गावांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आठवड्यात सहा टॅकर वाढले आहेत. चाळीसगाव दुष्काळी घोषित झाला आहे.

अमळनेर, पारोळा,भडगाव भागात पाण्याची समस्या बिकट आहे. चाळीसगाव, भडगाव भागातील अनेक मंडल, गावे दुष्काळी स्थितीत आहेत. टंचाईला तोंड देण्यासाठी आतापर्यंत १२ गावातील १४ ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

चाळीसगावचा मन्याड मध्यम प्रकल्प कोरडा आहे. एरंडोल मधील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतही जलसाठा जेमतेम आहे. सर्वात मोठ्या गिरणा धरणात साठा ४० टक्क्यावर असल्याने गिरणा पट्टा दुष्काळाच्या छायेत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठा १३.३६ टक्क्यांनी कमी आहे. जलसाठा घटत आहे.

याचाही फटका रब्बीला जसा बसला, तसाच फटका पाणीपुरवठा योजनांनाही बसत आहे. रावेर तालुक्यातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यामुळे या भागात जलसंकट तुलनेने कमी आहे. (latest marathi news)

Water Scarcity (file photo)
Jalgaon News : सामनेरला दहावीच्या परीक्षा केंद्रावर ‘मास कॉपी’

मोठ्या धरणातील पाणीसाठा

गिरणा-४० टक्के

वाघूर ८० टक्के

हतनूर ७८ टक्के

जिल्ह्यात १ ते ८ दिवसाआड पाणी पुरवठा महापालिका, नगरपालिका करीत आहेत.भुसावळला ८ दिवसाआड, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव एक दिवसाआड, चाळीसगाव चार, जामनेर तीन, अमळनेर पाच, बोदवड पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

"यंदा कडक उन्हाळा असल्याने पाणी टंचाईची गावेही वाढतील. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे नियेाजन केले आहे. अनेक गावांत टँकर सूरू आहेत. काही गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. नगरपालिका, नगरपरिषदांना पाणी कपातीचे आदेश दिले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा."- आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी )

टँकरद्वारे पाणी पुरवठा होणारी गावे

चाळीसगाव- विसापूर तांडा, अंधारी, करजगांव, कृष्णानगर, हातगांव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगांव, हातगांव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रूक प्र.दे, खराडी, डोणदिगर, तळेगांव, न्हावे, ढोमणे, पिंपळगांव, भडगाव तालुका- तळबंद तांडा, अमळनेर तालुका -तळवाडे, शरसाळे बुद्रूक.

Water Scarcity (file photo)
Jalgaon News : महाराजांच्या वैभवशाली आरमाराचे प्रदर्शन; संस्कृती महोत्सवात आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()