Jalgaon Server Down : रेशन धान्य वितरणात अडथळे! पारोळ्यात 39 टक्के लाभार्थी वंचित

Jalgaon News : जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला ई-पास मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे तालुक्यात ६१ टक्के धान्य वितरण झाले असून, उर्वरित ३९ टक्के लाभार्थी धान्य घेण्यापासून वंचित.
Server Down
Server Down esakal
Updated on

Jalgaon News : शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण करण्यात येते. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला ई-पास मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे तालुक्यात ६१ टक्के धान्य वितरण झाले असून, उर्वरित ३९ टक्के लाभार्थी धान्य घेण्यापासून वंचित राहत असून, उर्वरित धान्य लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे. (Obstacles in distribution of ration grains In Parole)

यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी व्यक्त केली जात आहे. तालुक्यात १३० रेशन दुकान आहेत. या दुकानाच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत धान्य वितरण केले जाते. तालुक्यांत ३२ हजार ६७२ कार्डधारक आहेत. त्यात अंत्योदय ७ हजार ३३७ तर प्राधान्य कुटुंबातील २५ हजार ३३५ लाभार्थी आहेत.

दरम्यान, २९ जुलैअखेर एकूण ३२, हजार ६७२ पैकी १९ हजार ९९३ कार्डधारकांना आजवर स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यात आले आहे. मशिनच्या सर्व्हर डाऊनमुळे सुमारे ३९ टक्के कार्डधारक धान्य घेण्यापासून राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित कार्डधारकांना धान्य मिळावे, अशी मागणी होत आहे.

दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ई-पाॅस मशिनच्या सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना कार्डधारकांना अंगठा घेतल्याशिवाय माल वितरण करता येत नाही. त्यामुळे कार्डधारक स्वस्त धान्य दुकानातदारांबाबत नाराजी व्यक्त करीत आहे. त्यामुळे उर्वरित रेशन धान्य मिळावे, यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी नुकतेच तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबत मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली. (latest marathi news)

Server Down
Jalgaon News: धरणगावातील अतिक्रमित जागा होणार नियमित! पहिल्या टप्प्यात 151 नागरिकांना लाभ; संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत माहिती

"शासनाच्या निर्देशानुसार अंगठा घेतल्याशिवाय धान्य वितरण होत नाही. सर्व्हर डाऊनमुळे अडचणी निर्माण झाले आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे." - आर. व्ही. महाडीक, नायब तहसीलदार पुरवठा विभाग

"दर महिन्याला मला वेळेवर धान्य मिळत होते. मात्र या महिन्यात सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे मला आजवर धान्य मिळाले नाही. पुरवठा विभागाने याबाबत योग्य ती उपायोजना करावी." - बुधा पाटील, लाभार्थी

मुदतवाढ मिळावी

दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या कार्डधारकांना मोफत धान्य देणे अनिवार्य आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे बरेचशे कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा कार्डधारकांना त्यांचे धान्य मिळावे, यासाठी मुदतवाढ मिळावी व त्यांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Server Down
Jalgaon Dam Water Storage : अनेर धरणाचे सर्व दरवाजे उघडले! धरण 58 टक्के भरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.