Jalgaon News : ‘भातुकलीच्या खेळामधली राजा अन् एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी’ या गीताशी साधर्म्य असणारी अन् काळजाचा ठोका चुकविणारी घटना कोळपिंप्री (ता. पारोळा) येथील शेतकरी कुटुंबात झाली. अवघ्या सहा दिवसांच्या फरकाने क्रूर काळाने घाला घातल्याने दोन कर्त्या महिलांची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. दोघींना हृदयविकाराचा झटका आला अन् होत्याचे नव्हते झाले. ( two women dead in heart attack )
विशेष म्हणजे दोन्ही महिलांची नावे मनीषा काटे अशीच होती. त्यांच्या जाण्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. मनीषा घनश्याम काटे (वय ४९) ह्या पती घनश्याम शिवराम काटे यांच्यासह वास्तव्यास होत्या. शेती व इतर कामे करून त्यांनी मुलगी व मुलाला उच्चशिक्षण दिले. मुलगी प्रज्ञा एमएससीचे शिक्षण घेऊन सासरी आहे, तर मुलगा हर्षलही ‘एमएससी’ करून बँकेत नोकरी करतोय. सर्वकाही सुरळीत असताना गेल्या शुक्रवारी रात्री मनीषा घनश्याम काटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (latest marathi news)
उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुःखाचे पाऊले मिटत नाही, तोच बुधवारी मनीषा किशोर काटे (वय ४५) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घटना घडली तेव्हा त्या मोठ्या भगिनींच्या गावी (डांगरी ता. अमळनेर) भेटायला गेल्या होत्या. मनीषा किशोर काटे पती किशोरसह कोळपिंप्रीत वास्तव्याला होत्या. त्यांना मुलबाळ नसले तरी ते इतर मुलांना प्रेम देऊन आपलेसे करायच्या.
त्यांनी मोठया बहिणीच्या मुलीस मानसकन्या मानले होते. दोन महिन्यांपूर्वीच तिचे थाटात लग्न करून त्यांनी कन्यादानही केले. दोन्ही महिलांचा स्वभाव सोज्वळ होता. हसतमुख, मितभाषी दोघी सर्वांशी सुपरिचित होत्या. अजातशत्रू म्हणून त्यांची गावात ओळख होती. क्रूरनीतीने त्यांना हिरावून नेल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे हे अर्ध्यातून जाणे त्यांच्या कुटुंबियांसाठी क्लेशदायी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.