Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त आज शहरात शोभायात्रा! जन्मोत्सवाची तयारी पूर्ण

Jalgaon News : श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे.
Lord Ram (file photo)
Lord Ram (file photo)esakal
Updated on

Jalgaon News : श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १६) आंब्याची पाने, फुलांनी मंदिरे सजविण्यात आली. बुधवारी (ता. १७) श्रीरामाचा जन्मोत्सव दुपारी बाराला जुने जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थान व बसस्थानकासमोरील चिमुकले राममंदिरात होणार आहे. (Jalgaon On occasion of Ram Navami procession in city today)

श्रीराम नवमीनिमित्त सकाळपासून श्रीराम मंदिरात पूजा, अर्चा, अभिषेक करण्यात येईल. श्रीरामाची भजने गायली जातील.

श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रा

अयोध्येत प्रभू श्रीराम आपल्या मूळ जन्मस्थळी विराजमान झाले आहेत, हाच जल्लोष संपूर्ण भारताने साजरा केल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम नवमीनिमित्त सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत आकर्षक ठरणारी प्रभू श्रीरामांची बारा फूट उंच मूर्ती असणार आहे.

सोबतच नऊ फूट उंच हनुमानाची मूर्तीचे आकर्षण ठरणार आहे. विश्वहिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, ललित चौधरी, अमित भाटिया, बंटी नेरपगारे, राकेश लोहार यांच्या नियोजनात मिरवणूक निघेल. (latest marathi news)

Lord Ram (file photo)
Jalgaon News : उमेदवार बदला, अन्यथा अर्ज भरणार; माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा

महाआरतीने सुरवात

गोलाणी मार्केटमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरपासून दुपारी चारला मान्यवरांच्या हस्ते महाआरती होऊन शोभायात्रेला सुरवात होईल. तेथून नाथ प्लाझा, टॉवर चौक, चित्रा चौक, दाणा बाजार, सुभाष चौक, जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिरात शोभायात्रेची सांगता होईल.

सजीव देखावा आकर्षण

शोभायात्रेत प्रभू श्रीरामांसोबत लक्ष्मण, सीतामाता व हनुमान यांची वेशभूषा धारण करून सजीव देखावा करण्यात येणार आहे.

विविध पथकांचा असेल सहभाग

रावेर येथील आखाड्याचे पथक डोळ्यावर पट्टी बांधून दांडपट्टा फिरविण्याचे सादर करणार आहेत. वरणगावचे लेझीम पथक, पन्नास दुर्गा पथक पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेणार आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दीडशे ते दोनशे धारकरी हातात भगवा ध्वज घेऊन संपूर्ण शोभायात्रेत असणार आहेत.

Lord Ram (file photo)
Ram Navami 2024: पुरुषोत्तम श्रीराम आणि ताणतणाव व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.