Jalgaon Onion Export : श्रीलंका, बांगलादेशासह मलेशियात कांद्याला मागणी; 63 ते 64 रुपये प्रतिकिलो भावाने विक्री

Onion Export : कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय झाल्यानंतर कांद्याच्या निर्यात वाढीस चालना मिळू लागली आहे.
Onion
Onionesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय झाल्यानंतर कांद्याच्या निर्यात वाढीस चालना मिळू लागली आहे. त्यामुळे खानदेश व नाशिक भागातील कांदा आखाती देशात मागणी होऊन ६३ ते ६४ रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. यांसह बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका आदी देशांतूनही या कांद्याला मागणी वाढू लागली आहे. या मागणीत अजून वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. (Onion demand in Sri Lanka Bangladesh along with Malaysia )

त्याचबरोबर अजून महिनाभरात बाजारात येणाऱ्या नवीन कांद्यालाही चांगला भाव मिळण्याची आशा वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी आता शेतात असलेल्या कांद्याच्या पिकाची निगा चांगल्या प्रकारे ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना कांद्याच्या प्रश्नामुळे धक्का पोहोचल्याने येत्या विधानसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेता शासनाने सावध पावले उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांकडे तसे पाहता आजच्या घडीला अल्पप्रमाणात कांदा शिल्लक आहे. (latest marathi news)

Onion
Onion Export: निर्यात शुल्क वाढीमुळे कांद्याची वाताहत! बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेवर अवलंबून राहण्याची वेळ; परकीय चलनावर परिणाम

लासलगाव बाजार समितीत कांदा किमान ३६ रुपये तर जास्तीत जास्त ४७ रुपयांप्रमाणे विक्री होत असून साधारणपणे सरासरी ४,५५० रुपयाने ही विक्री सुरू आहे. विरोधकांनी निर्यातबंदीचा मुद्दा पुन्हा उचलून धरल्याने शासनाला सावध पवित्रा घेत निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. निर्यात सुरू झाल्यावर भावात थोडी सुधारणा झाली असून, नाशिक व परिसरातील कांदा ६१ ते ६४ रुपये तर मध्य प्रदेशातील कांदा ५८ ते ६१ रुपये प्रतिकिलो दरम्यान विक्री होऊ लागला आहे.

दक्षिण भारतातील कांद्यास ६२ ते ६४ रुपयाचे भाव मिळत असून कांद्याचे भाव सध्यातरी तेजीत राहण्याची परिस्थिती दिसून येत आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या दररोजची आवक सुमारे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल इतकी आहे. त्यामुळे येत्या महिनाभराचा विचार करता कांदा भाव खाऊन जाईल, अशीच आजची परिस्थिती दिसून येत आहे.

Onion
Nashik Onion Export : शुल्क लागू झाल्यावर कांदा निर्यात निम्म्यावर; एप्रिल ते जूनमध्ये एक लाख 63 हजार टन निर्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.