Jalgaon Fraud Crime : सीएसआर फंडाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात शेततळे उभारण्याच्या पन्नास कोटीच्या कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत कंत्राटदार अजय बढे यांची ४५ लाखांत फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (Order to register case against suspect of fraud of 45 lakhs of contractor )
कंत्राटदार अजय बढे यांनी रेल्वेस्थानक परिसरातील खासगी हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत शेततळे उभारीणीच्या कामासंदर्भात व्यापक प्रमाणात शासनाकडून कामे निघणार असून, पन्नास लाखांचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगत निवृत्त वरिष्ठ अभियंत्यासह कार्यकारी अभियंता, तीन सनदी लेखापाल, कंपनीचे संचालक व अन्य दोन अशा आठ संशयितांनी ४५ लाख रुपये घेतले. मात्र, याच कामाची निविदा प्रक्रिया होऊन काम मात्र तिसऱ्याच व्यक्तीच्या कंपनीला मिळाले. पैशांची मागणी केली. मात्र पैसे परत करण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे बढे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.