Ration Distribution: ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याचे आदेश! सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्णय; धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा

Jalgaon News : राज्य शासनाने ई पास मशिनचा तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत ऑफलाईन अन्नधान्य वितरणाचे आदेश दिले आहेत. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रेशन दुकानातून धान्य वितरण बंद होते. त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ration distribution
ration distributionesakal
Updated on

जळगाव : रेशन दुकानातून राज्यभर ई पॉस मशिनद्वारे धान्याचे दर महिन्याला वितरण होते. मात्र, काही दिवसांपासून सर्व्हर डाउनमुळे रास्तभाव दुकानांमधून ई पास मशिनद्वारे धान्य देता येत नाही. यामुळे राज्य शासनाने ई पास मशिनचा तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत ऑफलाईन अन्नधान्य वितरणाचे आदेश दिले आहेत. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रेशन दुकानातून धान्य वितरण बंद होते. त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Orders to give ration offline Decision due to technical failure in server)

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्याचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरणासाठी रास्तभाव दुकानांमध्ये फोर-जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविल्या आहेत.

राज्यात काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची मागणी क्षेत्रीय कार्यालयांनी केली आहे.

केंद्र शासनाने मानवी अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूनांच्या अनुषंगाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्य वाटपासाठी रास्तभाव दुकाननिहाय लॉगीन तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना मेलद्वारे दिल्या आहेत.

त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगीन आयएमपीडीएस पोर्टलवर तयार केले आहे. ज्या व दुकानांचे लॉगीन आयएमपीडीएस पोर्टलवर तयार नसतील, अशा रास्तभाव दुकानांचे लॉगीन तत्काळ तयार करावे, अशा सूचना दिल्या आहेत. (latest marathi news)

ration distribution
E-Peek Pahani : आजपासून खरिप पिकांची नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी! जिल्ह्यात सुमारे 7 लाख हेक्टरवर होणार पीक पाहणी

अधिकारी राहणार उपस्थित

ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात. या कालावधीतील ऑफलाईन वितरण केलेल्या धान्याचा तपशील शासनास सादर करावा.

ऑफलाईन वाटप केलेल्या अन्नधान्याचा तपशील पोर्टलवर भरण्याची, तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यास अन्नधान्य वितरित करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप यांची राहील. ऑफलाईन सुविधा फक्त जुलैमधील अन्नधान्य वितरणासाठी राहील याची नोंद घ्यावी, असे परिपत्रक राज्य शासनाचे कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांनी काढले आहे.

ration distribution
Jalgaon News : 3 हजार कोटींचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयास सादर! पाडळसरे प्रकल्पास सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.