Jalgaon Cotton Crop Diseases: कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता; 61 हजार हेक्टरवरील लागवड बाधित होण्याची भीती

Cotton Crop Diseases : वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडसड, गुलाबी बोंडअळी, लाल्या आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
Cotton Crop Diseases
Cotton Crop Diseasesesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात काही ठिकाणी अतिपावासाने कपाशीचे नुकसान झाले असून, त्यातच वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडसड, गुलाबी बोंडअळी, लाल्या आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील ६१ हजार हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशीवर होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (outbreak of diseases on cotton increased concern )

चाळीसगाव तालुक्यात बागायती कपाशीचे ३० हजार १३८ हेक्टर तर जिरायत कपाशीचे ३० हजार २१३ हेक्टर क्षेत्र आहे. अशा एकूण ६१ हजार ५१ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लागवड थोडी वाढलेली आहे. वातावरणातील बदलाव विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विविध रोगांचा प्रादुर्भाव

कपाशीवर सध्या मावा, फुलकिडी, पांढरी माशी, तुडतुडे, बोंडसड, करपा, गुलाबी बोंडअळीसह बहुतांस भागात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शेतकरी विविध उपायोजना करीत असले तरी पाहिजे तसा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. यंदा तालुक्यात वरुणराजाची कृपादृष्टी चांगली झालेली असताना होणाऱ्या या नुकसानाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. ज्या काही भागात मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच फुलकिडे या रसशोषक किडींचा कपाशीवर प्रादुर्भाव होत आहे. अशा कपाशीवर किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (latest marathi news)

Cotton Crop Diseases
Jalgaon Cotton Crop : जिल्ह्यात अकरा CCI केंद्र! कापूस खरेदी लवकरच सुरू होणार; नोंदणी करण्याचे आवाहन

असा रोखावा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

एक टक्का यूरियाची म्हणजेच १०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अर्धा टक्का मॅग्नेशिअम सल्फेट म्हणजेच ५० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेटची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाला वाढीच्या टप्प्यानुसार खत द्यावे. केवळ रासायनिक खताचा भडीमार न करता शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि जीवाणू खते सुद्धा वापरावेत. जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी योग्य जमिनीत कपाशीची लागवड करावी.

''कपाशीवर होत असलेल्या विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे गावागावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कपाशीवर जैविक व रासायनिक खतांची फवारणी करताना योग्य प्रमाणातच करावी.''-धनजंय पाटील, मंडळ कृषी अधिकारी, चाळीसगाव

Cotton Crop Diseases
Cotton Crop Disease : कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव; पिके उपटून फेकण्याची बळीराजावर वेळ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.